पान:गांव-गाडा.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आणि हा आज येथं तर उद्यां दुसरीकडे अशी ढकलाढ़कल, कोंबाकोंबी व चेंगराचेंगर सदैव चालू राहिली. ह्याप्रमाणें मूळ भरितांतच जर कालवाकालव व गोंधळ तर त्यावरील माझ्या टिपणांच्या मांडणुकींत तंतोतंत टापटीप अगर टीपबंद व्यवस्थितपणा दिसून न आल्यास त्याकडे आपण कानाडोळा करतील अशी आशा आहे.
 भरितापैकीं ज्या खुंटांनीं व बोजांनीं माझें मन वेधिलें, त्यांचा मीं स्थूल दृष्टीन पण चाळणीच्या रीतीनें समाचार घेतला आहे. कितीही कणदार व सफाईदार माल चाळणींत घातला तरी ती बापडी त्यांतला केर, कळणा, कोंडा, भूस एवढेंच घेऊन उठते. पण त्यावरून त्यामध्ये सत्वांश किंवा ग्राह्यांश मुळीच नसतो अशी जर कल्पना केली, तर ती निखालस चुकीची ठरेल. तेव्हां खेडींपाडी व न स्थिरावलेल्या जमाती ह्यांमध्यें येथून तेथवर त्याज्यांश भरला आहे, असा समज हें पुस्तक वाचून कोणीही करून घेऊं नये. जसा व्यक्तीच्या कुटाळीचा प्रश्नच येथें उपस्थित होत नाहीं तसा कोणत्याही जातीची नालस्ती करण्याचादेखील होत नाहीं. कारण जे कांहीं दोष म्हणून दाखविण्यांत आले आहेत ते व्यक्तींचे नसून कालोदधीत वाहत येतांना त्यांतील खडकांवर आदळतां आदळतां छिन्न विच्छिन्न व बेरूप झालेल्या संस्थांचे आहेत, आणि त्यांची जबाबदारीही ज्या त्या संस्थेवर आहे. संस्था व त्यांना आधारभूत जी तत्वे त्यांची अथवा विशेषतः त्यांच्या विदीर्ण विकृत स्वरूपांची व उपाधींची ही सर्व लीला आहे. व्यक्ति व जाती-पोटजातीसारख्था संस्था ह्या बव्हंशी त्यांच्याच प्रेरणेनें नाचणाऱ्या बाहुल्या होत. संस्था व त्या स्थापन करणारे ह्यांच्यासंबंधानें मला बालाग्र अनादर नाही; आाणि तमाम जनता सहसा चुकत नसते, ह्या एडमंड बर्कच्या सिद्धांतावर माझी दृढ श्रध्दा आहे. प्राप्त परिस्थितीला योग्य अशा जनहितपोषक संस्था निर्माण करण्यांत मनुष्य आपले बुद्धिसर्वस्व प्रायः वेंचतो. तेव्हां भक्कम पुराव्याच्या अभावीं त्या व त्यांचे निर्माते ह्यांना दूर कालीं व देशीं नांवें ठेवण्याचा अधिकार कोणालाही सहसा पोंचत नाहीं; परंतु त्यांची छाननी वेळोवेळीं

२ ]