पान:गांव-गाडा.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०      गाव गाडा.

तडक पाण्यांत पळून जातात. पुरुष व बायका वनस्पतीचीं औषधे,भस्में,रांगोळी, सुया, दाभण विकतात. पुरुष शस्त्रक्रिया करतात, व तुंबड्या लावतात. पुरुष, बायका, पोरें, गांवांमध्ये भाकरी व कपडे आणि शेतांत धान्य मागतात. सर्व भटकणाच्या जातींत ही जात फार साळसूद आहे.व हेिच्या बायकांची पातिव्रत्याबद्दल फार ख्याति आहे.वर्षा दोन वर्षांनी पन्नास तें शंभर गोंड लोक वनस्पतींचीं औषधे, नकली सालममिश्री, सफेतमुसळी, वगैरे विकावयास एकमेळाने येतात. त्यांच्याजवळ ३०|४० म्हशी, १०|१२ तट्टे राहतात. ते गांवाजवळ पालें देतात आणि माणसा जनावरांच्या पोटासाठीं शिवार उकळतात. भराडी, गोंधळी, मुरळ्या, वाघे ह्यांची दहापांच बिऱ्हाडे, पोत्याच्या पालांत गांवाबाहेर उतरतात. त्यांच्याजवळ तट्टे, गाई, बैल, म्हशी, टोणगे, कोंबड्या, बकरी असतात. हे जनावर विकतात. खंडोबा ,भैरोबा, देवी वगैरे देवांची गाणीं, पोवाडे व लावण्या ते गातात, त्यावेळीं मंडळी जमून त्यांना पैसा दोन पैसे देते. त्यांपैकीं कांहीं बैठकीचे गाणे, व तमाशा करतात. हे गांवांत व शिवारांत भीक मागतात. भराड्यांच्या बायका गोदडया शिवतात व गोंधतात. भृत्ये नवरात्राच्या सुमारास घरोघर तेल,कपडे मागतात. त्याला बहुधा दर घरी एक पैसा मिळतो. आराधी वर्षभर भीक मागत फिरतात. जोगतिणी देवीच्या नावाने भीक मागतात.हिंदू हिजड्यांना जोगती म्हणतात. ते फार करून कुंभाराच्या घरीं उतरतात.ते टाळ्या पिढ्न अभद्र बोलतात, बायकी चाळे करतात, आणि देवीच्या नांवावर परडी फिरवून भीक मागतात. ते बहुधा दर घरी एक आणा घेतात. मुसलमान हिजड्यांच्या गुरूला ‘मुंढया'म्हणतात. तो मुसलमान असतो. अलमगीरचा जनाना हिजड्यांनी राखला, म्हणून त्यांनी हिजड्यांना व मुंढयांना वतन करून दिले, असें हे लोक सांगतात. हिंदू-मुसलमान हिजडे आपली कमाई मुंढयाला देतात. पोतराज महार किवा मांग असतो. तो शेंदूर फांसून लहंगा नेसून मरे आईचा देव्हारा घेऊन घरोघर फिरतो, स्वतःचे अंगावर शेंदराचा गोटा लावलेल्या आसुडाने कडाके