या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
सगुणला मूठमाती देण्याची वेळ. 단, ". या वेळेस एक तरुण स्त्री, जी पूर्वी आपल्या DBDDBDD DD DDDD DDD S DDD मनांत देवाची गोष्ट ठसली. त्या दिवसापासून तिने पापमार्ग सोडून खोस्तावर खरा विश्वास ठेविला, असें प्रमाण पटलें. मूठमाती देण्याची वेळ आली, आणि मी आणखी शेवटील अवलोकन करायाला प्रेताजवळ गेली. तिच्या हास्यमुख चेह-यावरून शांति दिसली. तिचे शेवटील शब्द माझ्या मनांत आले, आणि खचित ’मरण जयाने गिळले आहे, असें मला वाटलें. जें गीत सगुणीने अगोदर निवडून घेतले होतें, तें आह्मी कबरेजवळ गायलें, आणि ती पुन्हा आनंदाने उठेल असी आशा धरून आह्मी तिला मूठमाती दिल्ही. याप्रमाणे तिचा आमचा वियोग कांहीं वेळपर्यंत झाला. तो आमच्या दृष्टीपासून गेली आहे. परंतुशेवटील दिवसीं आपल्या तारणा-याच्या उजव्या हाताकडे पुन्हा दिसेल.