Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

VAR गवळ्याच्या कन्येची गोष्ट, आ०-(फार रडत व तुटक शब्दांनी) मी तिची गरीब ह्मातारी आई तिच्या अगोदर जावी. परंतु महाराज, तिने मला सोडून जावें, हें क्रिती कठीण ? उप०-ईश्वराच्या कृपेने थोड्या वेळाने तुमची तिची भेट होईल, असी माझी आशा आहे, आणि तेथें पुन्हा कधीं वियोग होणार नाहीं. ग:०-महाराज, अस्या विचारावरून मला समाधान होते. आणि मी तिच्या मरणाविषयीं पहिल्यापेक्षां अधिक मान्य आहे. स०-(शुद्धीवर येऊन) अहो बाबा, -अगे आई-तो मजवर कृपाळू आहेतुह्मी त्याजवर आशा ठेवा. त्याची स्तुति सर्वकाळ करा. (हळू बोलती), महाराज, आपले उपकार मानायास मी इच्छिते. आणि मी आपणापासीं एक अर्ज करितें. आपण माझ्या बहिणीला माती दिल्ही, तसी कृपा करून मला दावी,