Jump to content

पान:गंगाजल (Gangajal).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तेरा : उकल कधीतरी काहीतरी कोडं पडलेलं असतं. तेही इतक्या मागं की, आपल्याला एखादी गोष्ट कळली नाही ही गोष्टसुद्धा मन-जागृत मनविसरलेलं असतं आणि एकदम एखादे दिवशी अगदी भलत्याच संदर्भात उन्या आठवणी जाग्या होतात, मनाला डिवचतात व पुन्हा विचार करायला गवतात. जुनी कोडी उलगडतात, कधीकधी पूर्णपणे, कधीकधी नवी कोडी मनापुढे उभी करून. . ज्ञानदेवीच्या अठराव्या अध्यायाची सुरुवात म्हणजे शब्दांची कसरत ९. प्रत्यक शब्द समास आहे. त्या समासातील शब्दांचे अर्थ समजून सबंध "स कळायचा, म्हणजे मन एकाग्र करून वाचावं लागतं. माझ्या जुतीपमाणे सर्व चित्त देऊन मी वाचीत होते. पण माझ्या मनाचा काही ग मला नकळत भटक्या मारीत असला पाहिजे. डोळे वाचीत होते. जन्मजराजलदजालप्रभंजन." मन एकदम म्हणालं, “मदन-एडका मदन." वन हा शब्द 'प्रभंजन'सारखाच आहे. प्रभंजन-भंग करणारा; तसेच, 'मदन' ज मद आणणारा, मदास असणारा, म्हणजेच मद आलेला. 'एडका - म्हणजे 'मद आलेला एडका. अठरावा अध्याय राहिला बाजूला "ण जणू आता घडत आहे अशा प्रकारे पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणी "त झाल्या. आजीच्या बरोबर मी रत्नागिरीच्या विठोबा-मंदिरात होते. मामडपात भजन रंगात आलं होतं. सोनार मंडळींची दिंडी होती म्हणे. जण गळ्यात पखवाज अडकवून वाजवीत होता. इतरांच्या गळ्यात झांजा पा. सर्वजण अगदी रंगात येऊन भजन म्हणत होते व नाचत होते -