पान:गंगाजल (Gangajal).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ee डब्यात पेंगलेल्या इतर बायकाही माझ्याप्रमाणं चकित होऊन इकडे तिकडे बघत होत्या. किंकाळी कुठून आली कळलं नाही. एवढ्यात एक स्टेशनही यऊन गेलं. मला वाटलं, बाहेरच्या स्टेशनवरचीच एखादी किंकाळी ऐकू आलेली आहे. पण चालत्या गाडीत आणखी पाच-दहा मिनिटांनी परत तशीच किंकाळी ऐकू आली. ती माझ्या डब्यातून ऐकू येत होती. दुसरी किकाळी ऐकू आली. मी उठून पाहिलं. त्या मघाशी पाहिलेल्या तरूण मुलीच्या मांडीवरील मूल किंकाळ्या फोडीत होतं. मला पहिल्यानं वाटलं त्यापेक्षा मूल बरंच मोठं होतं. सहा महिन्यांचं असेल. बाई आली तेव्हा जशी स्तब्ध बसली होती, तशीच बसली होती. मांडीवर मूल होतं. मुलाचे डोळे मटलले होते. मठी वळलेल्या होत्या. किंकाळीनं तोंड वेडंवाकडं झालं स. पाहता-पाहता मुलाच्या मुठी सुटल्या. तोंड परत नीट सरळ झाल. पाच्या तोडावर कसलाच भाव नव्हता. बाकीच्या बायका 'काय झालं? काय झालं?' असं विचारीत होत्या. 'करतं असंच अधूनमधून,' असं तुटक उत्तर देऊन ती बाई स्वस्थ बसली. थोडा वेळ तिच्याभोवती उभं राहन जो-तो आपापल्या बाकावर सला. मीही आपल्या बाकावर बसले. मुलाला काहीतरी मोठा आजार साला होता, यात शंकाच नव्हती. काय झालं होतं, मला कळत नव्हतं. हा मदतही करिता येत नव्हती. मी स्वस्थ बसून राहिले. एवढ्यात णखी एक किंकाळी ऐक आली. पाहिलं तो बाई होती त्याच स्थितीत: साच पुतळ्याप्रमाणे नि:स्तब्ध. पण मला काही राहवेना. सबंध आगगाडीत सच एखादा तरी डॉक्टर भेटेल, त्याला बोलावून मुलावर काही उपचार सात का हे बघता येईल, असा विचार माझ्या मनात आला. मी उठले. मागून एक गाडीचे डबे शोधीत निघाले. शेवटी एका डब्यात डॉक्टर कळला. त्याला घेऊन परत आले. त्या डॉक्टरबरोबर आगगाडीतला काटतपासनीसही आमच्याबरोबर आला. आम्ही बायांच्या डब्यात N, तो लागोपाठ दोन किंकाळ्या ऐकू आल्या. आम्ही धावतच ती बाई " तिथ पोहोचलो. आम्ही मलाशी पोहोचेपर्यंत किंकाळ्या थाबल्या 1. डाक्टरनं मुलाकडे पाहिलं व छातीला स्टेथेस्कोप लावला. मूल मेलं हात. कसलाच उपचार करण्याची शक्यता नव्हती. काही करता येणं शक्य नाही, म्हणून डॉक्टर परत गेला. तिकीट चेकर १ळ उभा राहिला. त्यानं विचारलं, 'तुम्हांला कुठ जायच आहे?" बाई च आहाट चार