पान:गंगाजल (Gangajal).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बारा : किंकाळी चित्राचं नाव काय असावं, नक्की आठवत नाही. बहुधा ‘द क्राय! 'किंकाळी' - असावंसं वाटतं. चित्रकाराचंही नाव आठवत नाही. आठवत । फक्त चित्र आणि दरवेळी आठवलं म्हणजे भीतीनं अंग शहारतं. चित्र अगदा साधं- फक्त काळपांढरं. एक बाई, तीही अगदी साधी. अतिरेखीव नाही, विकृत तर नाहीच नाही. तिनं किंकाळी मारताना तोंड उघडलं आहे, एवळ, चित्र. पण पहिल्या क्षणापासून आतापर्यंत चित्र डोळ्यांपुढं आलं का, किंकाळी ऐकू येते. तो एकाकी असहायपणा, सगळं संपलं, अशी अगतिक जाणीव चित्र पाहताना जी झाली, ती आजही होत आहे. आणखी एक किंकाळी सारखी आठवते,- मनात घर करून रा आहे- ती म्हणजे काम्यूच्या 'फॉल' नावाच्या कादंबरीतील. कादंबरीतील सबंध कथानक एका किंकाळीभोवती गुंफिलेले आहे. कादंबरीचा नायक एक तरुण, हुशार माणूस आहे. गरीबगुरीब माण, खटले कोर्टात चालवून, त्यांना न्याय मिळवून देणारा म्हणून त्यान प्रार मिळविली होती. गरिबांचा कनवाळू म्हणून त्याचा सगळीकडे बोल झाला होता. त्याची ही कीर्ती चढत्या कमानीत होती. म्हाता कोताऱ्यांना तो मोठ्या आस्थेनं रस्ता ओलांडायला मदत करी. आपल्याला हुशार, लोकांत मानमान्यता पावलेला समजत असे. रस्त जाताना, किंवा विशेषतः कोर्टाच्या आवारात, त्याला पाहिल्या खाली वाकून नमस्कार करणारे, त्याला दुवा देणारे, ‘हा पहा ता" अमका,' म्हणून त्याच्याकडे बोट दाखविणारे लोक खूपच होते. तो गून त्यानं प्रसिद्धी या पच होते. तो स्वतः