पान:गंगाजल (Gangajal).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ९५ संबंधाने दोन अंगांनी होतो, तसा लोपही दोन अंगांनी होत असतो. ज्यामुळे स्वत्वाची जाणीव झाली, त्यांना आतून आत्मा विसरत असतो. बाहेरून इतर लोक त्या व्यक्तीला विसरत असतात. एखादी महान व्यक्तीसुद्धा एक पुसट आठवण म्हणून राहते. माझ्या मामजींना भारतरत्न' ही पदवी मिळाली, त्याचे दिल्लीहून मुंबईला पत्र आले व ‘मालक सापडत नाही,' ह्या शेऱ्यानिशी परत गेले. हा प्रसंग मी विसरूच शकत नाही. शाळेतल्या पुस्तकांतून ज्याच्याबद्दल धडा येतो, असा हा गृहस्थ जिवंतपणी बऱ्याच जणांना फक्त नाममात्रच झाला होता,- तोसुद्धा मुंबईत! त्यांनी तरुणपणी विधवाविवाह केला; त्यांच्याबद्दल पुणे-मुंबईच्या वर्तमानपत्रांनी उलट-सुलट टीका केली; गावाने त्यांना वाळीत टाकिले. त्या वेळी त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्कट होते. ते कोणाचेतरी, कशाचेतरी विरोधक होते. ते कोणत्यातरी व्यवहाराचे हिरीरीने मंडन करीत होते. शेवटी ते जगाला विसरले होते; जग त्यांना विसरले होते. ह्याच अर्थाने व्यक्तिमत्त्वाचा लाप होतो, असे मी म्हटले. प्रेम आणि राग, मैत्री आणि विरोध, आपुलकी आणि दुरावा-अगदी त्रयस्थपणासुद्धा- अशा अनेक व्यवहारांतूनच माझा अमुकपणा निर्माण होतो. निरनिराळ्या व्यक्तींना मी निरनिराळी असते, माझी भूमिकाही प्रत्येकाशी निरनिराळी असते. वयाप्रमाणे हा व्यवहार कमी होतो. जी अगदी जवळची असतात, ती मेलेली तरी असतात किंवा दूर तरी गेलेली असतात. कृतीमागील व विचारामागील तारुण्यातील उत्कटता नाहीशी होऊन सक्त आचाराच्या व विचाराच्या सवयी तेवढ्या राहिलेल्या असतात. संध्येच्या पर छाया सबंध दिवसभर पडलेल्या असतात. सर्वस्वी नाहीसे होण्याच्या भाळाखात जाण्याची वेळ आलेली असते, आणि अगदी ह्याचमुळे आत्मनिवेदनाची उबळ येते. र खुणेचा मार्ग' मागे ठेवून पुढच्या पिढीला वाट दाखवावयाची ह्या पचारामागेसुद्धा बऱ्याच अंशी वरील भावना असते. स्वत:ची 'खूण' ठेवायची पड असते. सर्व 'अमकपणा'. सर्व 'मीपणा' नाहीसा होणार, अजिबात रह कळते, आणि जन्मभर ज्याने सोबत केली तो मीपणा टिकावा, ज्याच्यामुळे हे व्यक्तिमत्त्व मिळाले त्यांच्या स्मृतीत काही दिवस घर करून हाव, म्हणून धडपड चालते. कोणी बोलत राहतात, कोणी फोटो काढतात, णा आपली बडबड कागदावर उतरवितात. “मी अमुक-अमुक आहे,प आहे,- अगदी तुमच्यातच आहे," असा तो आक्रोश असतो. १९६८