पान:गंगाजल (Gangajal).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

e४ | गंगाजल अगदी साधारण व्यक्तीतसुद्धा असाधारण वैशिष्ट्यांचा मीपणा आहे, असा माझा आग्रह आहे. माझी जी चूक होती, ती हे वैशिष्ट्य काहीतरी सर्वस्वी खाजगी आहे, असे वाटण्याची. मीपणा- इतरांपासूनचे आपले असे निराळे अस्तित्व -ह्याची जाणीवच मुळी इतरांबरोबरच्या व्यवहारातून होते. आपल्याबद्दलचे स्वत:चे असे जे चित्र असते, ते इतरांच्या आपल्याबद्दल ज्या आकांक्षा असतात, इतरांशी आपला जो संबंध येतो, त्यांतून उत्पन्न झालेले असते. अनामातून, निराकारातून आपण जन्माला आलेले असतो. जन्माला येतानाच आपल्याला आकार मिळतो. थोड्याच दिवसांत नाव मिळते आणि जन्मभर त्या नावाच्या त्या आकृतीत अनुभवांची भरती होत-होत व्यक्तिमत्त्व जमत राहते. “उपजलिया बाळकासी। नाव नाही तयापासी। ठेविलेनि नावेसी। ओ देत उठी।।"... नाव ठेविले, तरी ते नाव आपले आहे, हे कळायला वेळ लागतोच. ते नाव व ती आकृती मिळून एक 'मी' ची जाणीव होते. मग असंख्य देवाण-घेवाणीतून त्या 'मी' ला विशिष्ट आकार येत राहतो. भोवतालच वस्तुमय जग सारखे अपेक्षा निर्मीत असते. त्यांतील काही, आपली आळी, आपले घर, आपले गाव अशा त-हेच्या ममत्वाने 'मी' चे भाग बनून जातात. आपण कोणाचे तरी मूल असतो, कोणाचेतरी भावंड असतो; कोणाचीतरा बायको, आई, काकू, मैत्रीण, शत्रू असतो; गुरू, मालक, नोकर असता. प्रत्येक संबंधात आपण कुणाच्यातरी अपेक्षेप्रमाणे वागत असतो व कोणाकडून कशाची तरी अपेक्षा करीत असतो. प्रत्यक्ष परस्पर-संबंधातून अप्रत्यक्ष दूरवर पसरलेले संबंध निर्माण होतात. परस्पर-अपेक्षेतून मूल्ये निर्माण होतात. उतारवयात व्यक्तिमत्त्व, मीपणा कमी होत जातो. प्रत्यक्ष संबंध संकोचतात: म्हाताऱ्या माणसाने आयुष्याच्या वाटचालीकडे दृष्टिक्षेप केला, तर अस आढळते की, ह्या वाटेवरचा एक एक मैलाचा दगड म्हणजे एक हरवल व्यक्ती, एकेक हरवलेला संबंध असतो. आई-वडील, भावंडे, सासू-सासर दीर-जाऊ जे-जे म्हणून गेलेले असते, त्यांच्या संबंधाची स्मृती, छाया राहा, पण प्रत्यक्ष संबंधाचा उत्कटपणा नाहीसा झालेला असतो. ही माणसे जिल असताना आपल्या हातून असे झाले नसते, तर बरे झाले असते,'.... अर झाले असते तर...' अशी खंत वाटून एक प्रकारच्या विषण्णतेने आ झाकळून जातो. शेवटी शेवटी तर दुःखाची वा अपराधाची जाणीवही नाह होते. आपल्या आत्म्याचे दु:खही नाहीसे व्हावे, स्मृतीची तीव्रताही जा म्हणजे व्यक्तिमत्त्वाचाच लोप नाही का? व्यक्तिमत्त्वाचा विकास जसा परस्प