पान:गंगाजल (Gangajal).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ | गंगाजल स्थितीप्रमाणे वाक्यात निराळेपणा किंवा खोली यायला लागते. 'विश्वात्मकें देवें' हे दोन शब्द कितीदा ऐकिले असतील, डोळ्यांनी वाचले असतील, पण ह्या वेळच्या वृत्तीमुळे मन तेथेच घोटाळत राहिले. विश्वात्मकता, सर्वात्मकता म्हणजे सर्व एकाकी आत्म्यांचे भेटण्याचे स्थान नाही का? प्रत्येकाला विश्वात्म्याची भेट होण्याची शक्यता आहे, व काही असामान्य व्यक्तींना ते साधलेही होते विश्वात्म्याशी भेट म्हणजे सर्वत्र विखुरलेल्या एकाकी जीवांशीही भेट, ही परिस्थिती आपोआपच आली की,-ह्या विचारांनी मनाला बरे वाटले. म्हणजे हा नवा विचार मनात आल्याबरोबर माझी लगेच इतरांशी एकात्मता झाली, असे मुळीच नाही. पण 'एकटेपणा' वर एक तोडगा अस्तित्वात आहे. ह्या जाणिवेनेच बरे वाटले. मी आपली समजूत घातली की, एकटेपणा वाटणे म्हणजे आपल्याभोवती कुपण घालणे आहे. हे कुंपण तुटले, तर सर्वात्म्याशी व त्याच्या द्वारे इतरांशी खरा भेट होण्याची शक्यता आहे. पण मी आपल्याभोवती शब्दांचे जंजाळ पसरात होते व बोलाच्याच कढी-भाताने भूक शमविण्याचा प्रयत्न करीत होते. ___ज्या मनाने माझ्यापुढे हा विचार आणिला, तेच शत्रूप्रमाणे माझ्यापाठा लागले होते. मी कुठे दम खाईन किंवा विश्रांती घेईन, ह्याची सोयच नाहीशा झाली होती. कसे का होईना, माझे समाधान झाले होते ना, -पण मन स्वस्त बसू देत नव्हते. काहीतरी दुवा हाताशी आहे पण सापडत नाही, तसे झाल होते. नवा दुवा सापडला, तोही गोष्ट वाचता-वाचताच. पूर्वी वाचलेल पण नक्की आठवेनासे झालेले-फक्त हरहरीच्या रूपाने राहिलेले काय होत, " समजले व उलगडा झाला, आणि मनाची धडपडही थांबली. “आत्मा इदम अग्रे आसीत एकः एव।स: अकामयत। बहु स्याम।" पूर्वी पहिल्या आत्माच फक्त होता; एक होता. त्याने इच्छा केली, मी पुष्कळ व्हाव. अबिभेत तस्माद एकाकी बिभेति'... त्याला भीती वाटली. एकटे अ. म्हणजे अशीच भीती वाटते. “स वै नैव रमे। तस्मादेकाकी न रमत त्याला करमेच ना. एकटे असले, म्हणजे करमत नाही. त्याला वा आपल्याला बायको असावी. एकटे असले. म्हणजे असेच वाटते. मला खूप हसू आले. एकदम मनावरचे कितीतरी दिवसाच गेले. 'सर्वात्मा, सर्वात्मा' म्हणतात ना, तो पूर्वी एक होता, अद्विताय त्याला एकटे वाटले! त्याला वाटले, पुष्कळ व्हावे! Tथम दिवसांचे दडपण हाता, अद्वितीय होता,