पान:गंगाजल (Gangajal).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ८७ रागाने दूर निघून जाणे, रुसून कोपऱ्यात बसणे, जगाला कंटाळून लांब जाणे हे सर्व प्रकार खरे एकटेपणाचे नव्हत. आपली चहा होत नाही, लोकांना आपले अंतरंग समजलेच नाही, असे वाटून मनुष्य जेव्हा रागाने जातो, तेव्हा मनाच्या कुठच्यातरी कोपऱ्यात जगाच्या निकटपणाची जाणीव त्याला असतेच. जगाने माझी आज उपेक्षा केली, तरी उद्या त्याला माझी किंमत कळेल, ह्या गावी माझी बूज राहिली नाही, तरी कुठेतरी दुसरीकडे माझ्या भावनेला खासच साद मिळेल, अशी त्याची खात्री असते. ह्या एकान्तवासाची सर्व भूमिकाच लोकसापेक्ष असते. लोकांपासून तोंड वळविले, तरी पशुपक्षी, झाडे ह्यांच्या सहवासात संतकवी परमेश्वरचिंतन करीत होते असे दिसते. म्हणजे- जरी कोणी रुसले, रागावले, एकान्तवासात गेले, तरी एकटे नसते. . मला जे एकटेपणाचे ज्ञान झाले, त्यामुळे मी इतकी भांबावून, गडबडून गल, तो अगदी खराखुरा, अनादि-अनंत असा एकटेपणा आहे. तो माझाच नव्ह, सर्व जीवजातीचा, ज्यात-ज्यात म्हणून चैतन्य आहे, त्याचा एकटेपणा आहे. आपल्या भोवती जी माणसे आहेत, त्यांना आपण कधी भेटलोच नाहा, अशा भेटीची शक्यताच नाही: डोळा डोळ्याला भिडतो, काहीतरी मिळालेसे वाटते, पण ती खरी मिळणीच नाही; स्पर्शाची तीव्र अनुभूती ही पट नव्हे. एखाद्याचा पायरव कानी पडावा, त्याचे शब्द कानी यावे, पण हे सव भटीचे प्रसंग म्हणजे समुद्रात सहजगत्या प्रवाहाने एकत्र येणारी लाकडे अशा एकमेकांना टक्कर देतात, त्यापेक्षा विशेष असे काही नाही. शेवटचा पाय म्हणून देवाच्या पायांवर डोके ठेविले. मंदिराच्या दाराशी जरा बसले, चहा मनात हाच विचार आला, 'अठ्ठावीस युगे ह्या क्षणाची वाट पाहत तू मा असणार, जन्म-जन्मांतरीच्या फेऱ्यांत मी चुकून तुझ्या पायांवर येऊन मावळल ही काय भेट म्हणायची? एक आत्मा, दुसऱ्या आत्म्याला भेटणेच शक्य नाही. ह्या परिस्थितीला आल्यावर आपण शेवट गाठला, ह्यापलीकडे जाणे क्य नाही, असे वाटले. माझ्या समजतीप्रमाणे मी स्वस्थ होते; पण मला न ता, न सवरता मन ह्या कोंडीतून सुटण्याचा प्रयत्न करीतच होते. आता 36 मार्ग नाही. ही कबली द्यायला मन तयार नसतेच. नेहमीच्या वाचनातील ओळी व शब्द निराळ्याच संदर्भात मनापढे ला लागतात. शब्द तेच, प्रत्येक शब्दाचा अर्थ तोच, पण मनाच्या