पान:गंगाजल (Gangajal).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ | गंगाजल विभागाची मुख्य म्हणून मी राहिले. वेळच्या-वेळीच शहाणपणाने बाजूला सरून नव्या पिढीला वाव द्यावा, ते हातून झाले नाही. आणि काही सुदैवी सहकाऱ्यांप्रमाणे वेळीच मरणही आले नाही. त्यामुळे मूर्ख म्हाताऱ्यांची जी स्थिती व्हावयाची, तीच माझी झाली. भांडण तत्त्वाचे नसून सबंध पिढीचे होते. कुठच्याही नीतितत्त्वापेक्षा अगदी खोलवर गेलेल्या जीवसृष्टीतील एका प्रवृत्तीचा तो आविष्कार होता, हे आता माझ्या ध्यानात आले. हे पिढ्यांचे भांडण, एका पिढीने दुसरीचा नाश करावयाचा ही प्रवृत्ती सनातन आहे, सर्व जीवनसृष्टीत आहे. एकेका कुटुंबात आहे; सर्व समाजात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आढळणारे तरुणांचे मोर्चे तिचेच निदर्शक नाहीत का? पूर्वीच्या इतिहासात धाकट्या पिढीने थोरल्या पिढीवर इतक्या व्यापक प्रमाणावर व इतक्या तीव्रतेने हल्ले केलेले दिसत नाहीत. अशा त-हेचा हल्ला ही जर एक सनातन प्रवृत्ती आहे, तर तिचा आविष्कार हल्लीच एवढ्या तीव्रतेने का व्हावा? पूर्वीची थोरली पिढी मुलांना चांगले जरबेत ठेवीत अस, तेव्हा बंड व्हावयाची शक्यता खरे म्हणजे जास्त असली पाहिजे. हल्लाचा थोरली पिढी त्या मानाने तरुणांना दबून असते; तरुणांचे कौतुक कारत. तरीसुद्धा तरुणांनी इतके चेवून उठावयाला कारण काय? ___-याला कारणे दोन आहेत. पहिले कारण माणसाच्या शास्त्रीय प्रगता। आहे; दुसरे कारण म्हातारी पिढी तरुण पिढीचे जे वरवरचे लाड करिते, त्यात आहे. शास्त्रीय प्रगती ती अशी... गेल्या शंभर वर्षांत शास्त्राच्या सहाय्या मरण टळले नाही तरी लांबले मात्र खास आहे. पूर्वी मूल जन्माला येऊन म होणे म्हणजे एक दिव्यच होते. कित्येक मुले जन्मत:च मरत व निम्न शिम्म्यांना पाच वर्षांच्या आतच मरण येई. आता सर्व जगभर व आप भारतातसुद्धा बालमृत्यूचे प्रमाण खूप घटले आहे. पूर्वी पाचाल पंचवीसपर्यंत जाणारी मुलेच कमी होती. आता त्यांची संख्या दुपटी-तिप वाढली. ह्याचप्रमाणे दुसऱ्या टोकाला माणसे बहुतेक पन्नास वषा आतबाहेर मरत असत. साधारणपणे चाळीस-पन्नास वर्षे जगणारी मा अगदी सर्वस्वी निरोगी क्वचित असत. पण आता यकृत बिघडल, मंदावले की, त्यावर तोंडाने घ्यावयाची ओषधे आहेत; अंगात टोचाय सया आहेत. ऐकू आले नाही, तर कानाला चिकटवावयाला यंत्रे आहेत, दिसत नाही, तर चष्मा आहे. असे निरनिराळे टेक देऊन माणसे पंचेचाळात म्या च्या