पान:गंगाजल (Gangajal).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल । ७५ असे त्याचे स्पष्ट मत होते. नीतितत्त्वाची ही मीमांसा पाश्चात्त्य जगास फारच पसत पडली. दोनशे वर्षे ती आपला अंमल जगभर गाजवून आहे. भारतातील सिंहाचे एका राजाने जे ऐकले नाही. ते ह्या ब्रिटिश नरसिंहाचे हणण जगाने शिरोधार्य मानले. शिवाय, गाय खायला मिळाली नाही, वचपाही गायखाऊ राष्ट्रात जन्मल्यामळे निघाला. जन्मल्यापासून मरेपर्यंत बथम नरसिंहाने कितीतरी गुरे खाल्ली असणार. बेंथम १८३२ मध्ये मेला. कृतार्थ, सुफलित जीवन जगन गेला. परत जन्म घेण्याची त्याला आवश्यकता राहिली नाही. १९७० हा लेख कालिदासीय रघुवंशाच्या दुसन्या सर्गावर आधारलेला आहे. भाषांतर गोळाबेरीज आहे: शब्दश: नाही.