पान:गंगाजल (Gangajal).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ / गंगाजल कार्य एका दृष्टीने जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या कार्यासारखेच आहे. ज्याप्रमाणे विश्वाचा विचार करितांना त्याला मानवी मूल्यांची कसोटी लावणे वेडगळपणाचे ठरेल, त्याप्रमाणे थोड्या अंशाने रोजच्या व्यवहारातील योग्यायोग्यतेची कसोटी कलेला लावणेही सर्वस्वी योग्य होणार नाही. “थोड्या अंशाने सर्वस्वी योग्य होणार नाही," ही शब्दयोजना मी सहेतुक केलेली आहे. कला हा जरी व्यक्तीच्या भावनांचा, बुद्धीचा व कल्पनाशक्तीचा आविष्कार असला, व कलावंताला स्वत:ला तो अगदी सर्वस्वी व्यक्तिनिष्ठ वाटला, तरी कलेचे रूप, कलेची मूल्ये, कलावंताच जीवन ही सर्वत्र समाजाने घडविलेली अशी असतात. शिवाय, कलेच पांघरूण घेऊन कलावंत नसलेल्या लोकांना कलेप्रमाणे भासणारे असे काहीतरी बनवून त्यापासून लोकांकडून पैसेही काढिता येतात. अश्लील वाङमयाबद्दल काही वर्षांपूर्वी बोलताना एक पोलिस अधिकारी म्हणत होत की, असे वाङमय निर्माण करणारी पुण्यातील काही मंडळी थोड्या अवधात इतका पैसा मिळवितात की, मोठमोठे दंड भरूनही वर्षानुवर्षे त्यांना आपला धंदा चालविता येतो. ह्यासाठी कलेच्या स्वातंत्र्याचा पुकारा करून अश्लीलतेला उत्तेजन दिल्यामुळे लोकांच्याबरोबर कलेचीही हानी होते, अस मला वाटते. अश्लीलता नेमकी कशात आहे, हे ठामपणाने बोट ठेवून सांगता या नसले, तरी तो वस्तूचा गुणधर्मच नाही, म्हणून अशी काही गोष्टच नाही, अ म्हणणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणे आहे. अश्लीलतेचा विचा करिताना ती निर्माण करणाऱ्यांचा हेतू, ती ज्यांच्यापर्यंत पोहोचते त्याचा संख्या व जितका वेळ पोहोचत राहते तो काळ ह्या तिन्ही गोष्टी लक्षा घ्याव्याच लागतात. संस्कृत ग्रंथांतून उत्तान शृंगारिक वर्णने असली, तरी एक तर ती आनुषंगिक असतात, इतर दुसऱ्या गोष्टींबरोबर ओघाओघाने आलला असतात, व दुसरे- सामान्य मनुष्याला ती मिळत वा समजत नाहीत. फार थोड्या लोकांपर्यंत ती पोहोचतात. अशा एखाद्या ग्रंथाचे भाषांतर करित त्यातील इतर सृष्टी बाजूला ठेवून फक्त उत्तान शृंगाराचाच भाग चवीच भाषांतरित करून पैसे मिळविण्याच्या हेतूने लोकांच्या हातात पडल केले, तर हा आचार गर्दा व दंडनीयच समजला पाहिजे. दंड करणारा किंवा संस्था कोणती असावी, व दंड किती असावा हे ठरविणे कठीण केवळ शिष्ट लोकांना किंवा खऱ्या रसिकांना असंमत म्हणून अशा गा न अशा गोष्टीचा