पान:गंगाजल (Gangajal).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ६५ सौंदर्याचा उपयोग नोकरीत बढती मिळण्याकरिता कितपत करावा, की मुळीच करू नये, देवभक्ती करीत असतानाही आचारातील कडवटपणा किती ठेवावा, स्वत:च्या आचारावर कितपत बंधने घालावीत, कुटुंबियांच्या आवडी-निवडी, शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य यांना कितपत किमत द्यावी, या सर्व गोष्टींना लिखित व त्यापेक्षा अधिक प्रमाणाने अलिखित मर्यादा असतात. ह्या मर्यादा समाजातील निरनिराळ्या व्यक्तींना, निरनिराळ्या असू शकतात. कुमारिकेच्या वागण्याचे नियम, सौभाग्यवतीच्या वागण्याचे नियम व विधवेच्या वागण्याचे नियम हे बऱ्याच वळा निरनिराळे असतात. एवढेच नव्हे, तर एकाच त-हेच्या नियमांची तीव्रताही निरनिराळी असू शकते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या वयांप्रमाणेही वागणुकीचे नियम निरनिराळे असतात व त्यांच्या अंमलबजावणीच्या कडकपणातही फरक पडतो. ___ निरनिराळ्या वर्गांतील जातींतील लोकांबद्दलचे नियम निरनिराळे असतात. सर्व त-हेच्या लहानमोठ्या नियमांचे उल्लंघन निरनिराळ्या व्यक्ताकडून होत असते. व त्या व्यक्तींना बऱ्याचदा ह्या-नाही-त्या रूपात समाजाकडून धिक्कार, उपहास किंवा प्रत्यक्ष दंड अशा निरनिराळ्या अकारच्या शिक्षा भोगाव्या लागतात. व्यवहारातील सर्वच नियम व त्यांबद्दल पाटणारी आस्था हा एका दृष्टीने संस्कृतीचा पाया आहे व दुसऱ्या दृष्टीने संस्कृतीचे कार्य आहे. समाज रचनेच्या मुळाशी असलेल्या सर्वच लहानमोठ्या नियमांना 'धर्म' ही संज्ञा देणे अयोग्य नाही. समाजधारणेचा पाया म्हणून, आणि समाजधारणा अव्याहत चालावी म्हणून जे काही लिखित पण अलिखित नियम आहेत, त्या सर्वांना व्यापक अर्थाने 'धर्म' म्हणता ल. त्याच व्यापक अर्थाने लग्नाच्या बायकोशी वागताना 'मी कोणत्याही समाजधर्माचे उल्लंघन करणार नाही,' अशी शपथ ‘धर्मे च अर्थे च कामे च पराम' ह्या वाक्याने केलेली दिसते. ह्या वाक्यात 'धर्म' याचा अर्थ न व्याख्येइतका व्यापक नसन आपण नेहमी 'धर्म' हा शब्द जसा परता, तसा संकुचित आहे. पण 'अतिचर' म्हणजे काय, हा वादाचा 17 हाता; व समाज सारखा बदलत असल्याने समाजाची मूल्ये बदलत असतात; आणि आचार व अतिचार यांच्या मर्यादाही मागेपुढे होत असतात. समाजाच्या काही अवस्थांमध्ये आचार व अनाचार यांच्या मर्यादा