पान:गंगाजल (Gangajal).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ५५ सूर्य गेला पण वर उजेड आहे, रात्र झाली नाही पण खाली अंधार आहे, डोळ्यांत प्रकाश हृदयांत काळोख अशा ह्या मधल्या वेळेला जीव टांगणीस लागला आहे. उजेड गेला वर-खाली, बाजूला सगळा अंधार अंगाला घट्ट लपेटलेला थंडीने गारठलेला पुढे न सरकणारा अढळ, अटळ उद्या उजाडणार का?