पान:गंगाजल (Gangajal).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ | गंगाजल "तुला एक विलक्षण प्रकार सांगू का? अग, मला माझी आई सापडली!' ही पोर मला सात-आठ वर्ष माहीत आहे. तिची थोरली बहीण त्या वेळी माझ्या चांगली ओळखीची होती. हिचं नाव मी ऐकायची. प्रत्यक्ष पाच-सहादा पाहिली असेल, इतकंच. हिला पहिल्या वेळी पाहिलं, तेव्हा ती अठरा-एकोणीस वर्षांची असावी. जरा लठ्ठ; तोंडावर विशेष कोणताच भाव नाही; जरा अंगानं आडवी आणि तोंडावर बालमुखाची गोलाई, अशी ती मला दिसली. तिची थोरली बहीण अक्का फार हुशार, फार शांत, विचारी, वयाच्या मानानं जास्तच प्रौढ अशी होती. ह्यात काही नवल नव्हत. तो आपल्या बापाचा आईनं अर्धवट टाकिलेला संसार संभाळीत होती. धाकटी पाच का सहा वर्षांची असताना, तिची आई नवऱ्याला १ लहान मुलांना सोडून गेली होती. तेव्हापासून बाप, भाऊ व बहीण ह्या अक्कानंच संभाळलं होतं. घर मोठं स्वच्छ व व्यवस्थित ठेविल हा वडिलांचं ऑफिस, लहान भावांच्या शाळा ह्या वेळा साधून सगळ्या जेवणखाण व्यवस्थित ठेविलं होतं. धाकटीची तर ती आईच झाली हो। नहाणं-माखणं, कपडेलत्ते सर्वच तिनं केलं. आपली आई नाही, . धाकटीला कधी वाटलं असेल, असं दिसत नव्हतं. थोरली जितकी शा तितकी ही अवखळ आणि धसमुसळी. थोरली विचारी, तर ही अजून वि करायला शिकली नव्हती. थोरलीसारखीच हुशार मात्र होती. शाळेत व नंबर सुटला नाही, तसा कॉलेजात वरचा सुटला नाही, अक्कामुळ * वाण अशी भासली नाही, पण आई मला टाकून गेली, म्हणून तिच्य तिरस्कार व राग मात्र मनात भरून राहिला होता. पण आयुष्यक्रम स' पालटला. अक्काचं लग्न झालं. एवढंच नव्हे, पण ती सातासमुद्रा गेली. तिच्या मागोमाग दादाही अभ्यासाच्या निमित्तानं गेला. इतक अक्काच्या मायेत वाढलेली छोटी आता घरातली मोठी झाला. संभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आली. __ अक्कानं तिला स्वैपाकपाणी सर्व शिकविलं होतं. घरकाम अवघड वाटलं नाही. पण वडिलांची ओळख मात्र नव्यान हा अक्काच्या राज्यात तिला वडिलांशी बोलण्याचा कधी प्रसगाव नव्हता. वडिलांनी तिला कधी जवळ घेतलं आहे, कधी तिच्याशा, का होईना, संभाषण केलं आहे, असं तिला आठवत नव्हत. १ नक्कामुळं आईची ' म्हणून तिच्याबद्दल व्यक्रम सपाट्यानं सिमुद्रापलीकडं गला. इतके दिवस । झाली. वडिलांना ति. घरकाम तिला व्यानं होत होती. प्रसंगच आला च्याशी, लहानसं नव्हतं. सर्व काही