________________
१३८ । गंगाजल यांनतर विविध स्मृती चाळविल्या जातात. वेळोवेळी आपले आवडते महिने बदलत कसे गेले, हे सांगताना खांडेकर विविध महिन्यांची नावे घेतात. शेवटी श्रावणावर येऊन संयमाचे महत्त्व सांगून हा लघुनिबंध संपवितात. सहजगत्या घडलेल्या एका संवादापासून आपण आरंभ करतो आहो, असा लेखकाने कितीही जरी आविर्भाव केला, तरी वाचकांच्या ष्टीने एक सत्य शिल्लक राहते. ते म्हणजे, काय सांगायचे हे लेखकाने आधी निश्चित केलेले होते; आणि नंतर ते कसे सांगायचे, याची रूपरेखा आखली होती. वाचताना जरी लघुनिबंधाचा आरंभ अप्रस्तुतापासून दिसत असला, व शेवट प्रस्तुतावर होत असला, तरी लेखकाच्या मनात मात्र प्रस्तुत आधीच निश्चित ठरलल होते. नजरेसमोर प्रस्तुत ठेवून लेखक अनुरूप अप्रस्तुतापासून आरंभ करिता व मग एखादा कुशल खेळाडू समोरच्या गड्यासमोर चेंडू खेळवीत बसता, त्याप्रमोण लेखक वाचकाला खेळविण्याचा प्रयत्न करितो, आणि चटकन गोल मारून प्रस्तुत गाठतो. हाच प्रकार जर ललित-निबंध म्हणून येणार असेल, तर मग त्यातली गोडी फार वेळ टिकणे शक्य नव्हते. शेवटचा परिच्छेद वाचल्यानंतर तो ललित निबंध फार वेळ वाङमयीन समाधान देणारा उरू शकत नव्हता. हा वैचारिक निबंधच होता. पण लहान मुलान गोष्टीरूपाने नीतिबोध करावा, त्याप्रमाणे या लिखाणात आपली " वाचकांच्या गळी उतरवावी, हा सौदा पटविण्यासाठी कुशल मध्यस्थाप्रम लेखक अघळपघळ गोष्टी सांगत होते. ह्यात क्रीडा असली, आणि काश असले, तरी ते लेखकाचे होते. वाचकांच्या खऱ्या भुका यामुळे तृप्त । कठीण होते. खांडेकरांच्या ललित-निबंधाविषयी हे आणि यासारखे असे कि विवेचन मी केले तरी मराठी टीकाकार त्यामुळे रागावण्याचा सभव आहे. कारण खांडेकर वाचकांचे नेहमीच आवडते आणि टीका तितकेच नावडते लेखक राहिले. पण जे खांडेकरांच्या लघुनिबंधाच आहे, तेच फडके यांच्याही गुजगोष्टीचे रूप आहे. फडक्यांनी जिव्हाळ्याने सांगण्याचा अभिनय केलेला असो, आणि कितीहार त्यांनी त्याची मांडणी केली असो, त्या लिखाणाचे मूळ रूप फडक्यांचाही निबंध अप्रस्तुतापासून सुरू होई. तेथून वाचकाना 3 भुलवीत प्रस्तुतापर्यंत फडके प्रवास करीत. शेवटच्या परिच्छेदात सांगून ते मोकळे होत. 'माणसाला जे मिळत नाही, ते हवे असत' ग्याचा संभव कमी आणि टीकाकारांचे । लघुनिबंधाचे रूप डक्यांनी कितीही कितीही रेखीवपणे मूळ रूप तेच होते. काना भुलवीतपारच्छेदात प्रस्तुत हव असते, मग ते