Jump to content

पान:गंगाजल (Gangajal).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ | गंगाजल त्यांचे रूपांतर होताना मी पाहिले आहे. आणि त्या-त्या लेखामागची त्यात्या वेळची बाईंची मनोवृत्ती मी बऱ्याच जवळून पाहिली आहे. मी जे काही लिहीन, त्याहून सर्वस्वी निराळे असे सूत्र दुसऱ्या कोणास सापडले, व त्याने ते मांडले, तर त्यात मला आनंदच आहे. 'परिपर्ती' व 'भोवरा' हे ललित निबंध संग्रह एकाच वेळी वाचले म्हणजे आपोआपच एक ठळक गोष्ट लक्षात येते. या संग्रहांतून बाई स्वत:च्या जीवनाबद्दल आणि स्वतःच्या विचारसरणीबद्दल खूपसे काही सांगून जातात. भोवरामधील ‘सुटका' या लेखात त्यांनी ते जास्त स्पष्टपणे सांगितले आहे. “एका माणसाची आयुष्याची कमाई किती असणार? ती कमाई करताना अनुभूतींचा प्रवाह तुडुंब भरून वाहून चालला की, मनुष्य आपण होऊन दुसऱ्याला बोलावते, व आपली कमाई वाटीत सुटते.' बाईंच्या अनुभूतीचा प्रवाह तुडुंब भरून वाहून जाऊ लागला की, बाइ सांगायला लागतात. मग त्यांना कुणी आग्रहही करावा लागत नाही. 'गंगाजल'मधील ललित-निबंधांत बाईंची अनुभूती कुठे सापडते का हे पाहू गेले की, 'बॉय फ्रेण्ड'पासूनच त्याच्या खुणा दिसू लागतात. बाई स्वतः होऊनच आपले आणि पंढरपूरच्या विठोबाचे नाते सांगतात. त्यात भक्ताचे विविध प्रकार सांगताना आर्त होऊन पंढरपूरला जाणाऱ्या बाई एकीकडे अर्थार्थीही असतात. सोसवेनासा भार शिरी पडला की, त्यांना हरी आठवतो. एकाकापण प्रसंगाला तोंड देण्याचा प्रसंग आला की, बाई पंढरपूरच्या विठोबाजवळ ब० मागायला जातात. आलेला प्रसंग सोसायचे सामर्थ्य दे. म्हणून काकुळत येऊन त्याला मिठी मारितात. बाईंची ही काकुळती लौकिक नसत व्यावहारिक अर्थाने त्यांना काही मागावयाचे नसते. माणसा भावजीवनाची गुंतागुंत मोठी विलक्षण असते. माणूस जवळ आला आ स्वतःला विसरून आपण त्याच्यावर प्रेम करू लागलो (मग ते । स्वत:साठी का असेना), की, ही व्याकुलता, हे रडणे-हसणे सगळे आल कधी कधी ही गुंतागुंत फारच वाढते. तीतील सुटा धागा कुठे साप नाही. अशाही काही प्रसंगी बाई आपल्या जिवलगाला भेटण्यास जात आ बऱ्याचशा शांत होऊन परत येत, असे मला बऱ्याच वेळा जाणवले आह बाईंच्या मनात जीवनासंबंधी अपार श्रद्धा होती. 'देवळाविना " पडत