Jump to content

पान:गंगाजल (Gangajal).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | १०७ नाही, बाजूला बसली होती जुन्या लुगड्यात, तर तो तू का आली नाहीस म्हणून भांडायला लागला.' तिनं नीट ऐकिलं. “असं होय? बावळट होता म्हणायचा!" ती म्हणाली. जुनं कोडं उलगडलं. नव्या कोड्यातून सुटका झाली. लहानपणी पडलेली बरीचशी कोडी शिक्षणाच्या कोतेपणामुळे पडलेली असतात. पुरेसा अनुभव नसतो, शब्दांचे अर्थ माहीत नसतात, म्हणून मन घोटाळ्यात पडतं. पण गुंता उत्पन्न होण्यास हेच कारण आहे, असं नव्हे. अगदी मोठेपणी अनुभवाची व ज्ञानाची पुरेशी सामग्री असूनही मन नसत्या घोटाळ्यात पडतं, ते केवळ पूर्वानुभवामुळं म्हणजेच पूर्वाग्रहामुळं. वाचता-वाचता काही-काही मुद्दे लक्षात येऊन पुढचं वाचन मग त्या पहिल्या अनुभूतीच्या चौकटीतून जाऊ लागतं. वाचताना लागणारा मनाचा लिपपणा नकळत नाहीसा झालेला असतो व मग माणूस नसत्या घोटाळ्यात पडत. उद्योगपर्वातील कर्ण-कुंती-संवाद मी एकदा वाचीत होते. कुंती कणाला सांगते. "बाबा. त राधेय नाहीस, कौंतेय आहेस. तुझा बाप सूर्य व नाई मी,- आता त आपल्या भावांना सामील हो व रामजनार्दनां (पळरामकृष्णां) प्रमाणे तुमची कर्णार्जुनांची जोडी युद्धात शोभू दे." ह्या पणावर कर्णाचं फार विदारक उत्तर आहे. त्या उत्तरात त्यानं म्हटलं आहे, है तुझा नियोग (नियोगकरणं तव) माझं धर्मद्वार होऊ दे. मी क्षत्रिय म्हणून मला, पण माझ्यावर क्षत्रियाचा एकही संस्कार झाला नाही. पूर्वी कधी उभा आईचा कळवळा आला नाही. आज जे सांगते आहेस, ते केवळ पलपोटेपणामुळे..." वगैरे. “तुझ्या नियोगामुळे मला धर्माच दार कळ झालं." ह्या वाक्याचा अर्थ लागेना. कंतीनं कमारी असताना सूर्याशी कला, ह्या क्रियेला 'नियोग' हा शब्द का लावावा? 'नियोग' म्हणजे जिवत असताना त्याच्या आज्ञेनं वा संमतीनं वा तो मेल्यावर त्याला पुत्र करून देण्यासाठी इतर पुरुषाबरोबर (बहुतेक दिराबरोबर) केलेला जो ता. ह्या व्याख्येत तर कुंती-सूर्य-संयोग बसत नाही. बर, त्यामुळ "पार मोकळं झालं, म्हणजे तरी काय? ह्या घोटाळ्यात मी पडले व अथाची टीप माझ्या लेखात देऊन इतरांनाही मी घोटाळ्यात टाकिलं. बिका, अंबालिका व कंती सर्वांनीच नियोगानं पुत्रोत्पती करून घेतली ता. हे माझं पूर्वज्ञान इथं माझ्या आड येत होतं. लीलाबाई अर्जुनवाडकरांचं न असं पूर्वग्रहानं भरलेलं नव्हतं. त्यांनी 'नियोग' शब्दाचा सरळ अर्थ केला प्राप्त