पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 माईसाहेबांची माझी ओळख गेल्या वीस एक वर्षांतली. निमित्त होतं... अनुताई वाघ यांचं. कोसबाडच्या टेकडीवर, दाभोणच्या जंगलात बालशिक्षणाचा दिवा घरोघरी लावणाऱ्या अनुताई आमच्या बालकल्याण संकुलाबद्दल ऐकून होत्या. त्यांना दाखवायला म्हणून माईसाहेब आल्या होत्या. ती त्यांची नि माझी पहिली ओळख. त्या भेटीत कळलं की, माईसाहेबांना आलेल्या अकाली वैधव्याच्या उदत्तीकरणाच्या संक्रमणकाळात त्यांनी आमच्या संस्थेतली एक मुलगी सांभाळली होती. पुढे त्यांना त्यातून मुलांचा लळा लागला नि त्यांनी ‘बाल देवो भव' हे आपल्या जीवनाचं ब्रीदंच बनवून टाकलं.
 तरुणपणीच पतीनिधनाचा आघात सहन करावा लागलले या माईसाहेबांनी मुलांसाठी जीवन समपिर्त करायचं ठरवलं. खुद्द माँटेसरीकडूनच त्यांनी बालशिक्षणाचा ओनामा नि वसा घेतला. तो आजन्म जपला. शाळेतील मुलांशी वागा-बोलायची माईसाहेबांची रीत खानदानी होती. त्या स्वतः बालवाडीत शिकवत, तेव्हा जातीनं उभं राहून नमस्कार करून मुलांचं स्वागत करायच्या... या अमोल नमस्ते.. तुम्ही काल आला नाही...' असं बालवाडीतील मुलांशीही यांचे ‘अहो-जाहो बालणं बरचं सांगून जायचं. त्यामागं एक संस्कार असायचा. आपण मुलांचा, उगवत्या पिढीचा आदर करायचा. मग उत्तरायुष्यात ती आपला आदर करेल... ‘आधी केले नि मग सांगितले' च्या पुढचा आचारधर्म असायचा माईसाहेबांचा. सारं द्यायचं, सांगायचं, शिकवायचं ते आपल्या व्यवहारातून. माईसाहेबांबद्दल समाजमानसात आदरभाव होता, त्याचं हे रहस्य होतं.
 बालवाडीनंतर प्राथमिक शाळा सुरू झाली. चौथीपयर्ती माईसाहेबांकडे शिकललेली मुलं बाहेर रमायची-रुळायची अवघड व्हायचं. मग पालकांचा आग्रह म्हणून त्यांनी हायस्कूल काढायचं ठरवलं. आपल्या छपरीच्या बखरीत हायस्कूल मावायचं नाही म्हणून त्यांनी हायस्कूलच्या स्वतंत्र इमारतीचा घाट घातला, तो पालकांच्या उसन्या उत्साहामुळेच. आराखडा तयार करून प्रत्यक्ष इमारत बांधताना त्यांना पैशांची चणचण भासू लागली. शहरातील धनिकांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. तशी त्यांना वालावलकरांची आठवण झाली. माईसाहेब येणार म्हणून म्हणून बापूसाहेब वालावलकरांनी मला बोलावून घेतले. त्या वेळी मी त्यांच्या ट्रस्टचा सचिव होतो. बापूंना माईसाहेब घरी येणार म्हणून कोण आनंद झाला होता.

 ‘किती पैसे हवेत तुम्हास?' पाच हजार... माईसाहेबांचं उत्तर... शाळेला एकूण किती पैसे लागणार आहेत!

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/९१