पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिटल माँटेसरी : माईसाहेब बावडेकर

 'मॅन के म फ ाम अदर प्लसे अडॅ ट्रॅव्हल नन' असं इंग्रजीत एक प्रसिद्ध लोक प्रचलित वाक्य आहे. त्याचा आशय जगणं म्हणजे नुसतंश्वास घेणं नि सोडणं नाही, जगणं म्हणजे जीवन सार्थकी लावणं.काही माणसांचा जन्मच मुळी आजीवन अंगीकारलेल्या कायार्त जात असतो. अशी माणसं अपवाद असतात की, जी आयुष्यभर एका कामास वाहून घेतात. श्रीमंत माईसाहेब बावडेकर अशा व्यक्तीपैकी एक होत्या. त्यांच्या मृत्युपूर्वी दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट.त्यांना दवाखान्यात दाखल केलं म्हणनू विचारपसू करायला मी डॉ.केळवकरांच्या ताराबाई पार्कमधील रुग्णालयात गेलो होतो. तिथं त्यांची सावली म्हणून गेली अनेक वर्षे सेवारत राहणाऱ्या संतोषला हाक मारताच तो माईसाहेबांपुढे भक्त हनुमानासारखा 'जी महाराज म्हणून अदबीनं उभारायचा.त्याचा शिरस्ता हा माईसाहेबांवरील भक्तीचं प्रतीक असायचा. चौकशीत कळलं की, माईसाहेबांचं खाणं संपलंय...' आता भिस्त गोळ्यावर नि कृत्रम प्राणवायूवर... अशा स्थितीतही माईसाहेब मनाने शाळेतच होत्या.

 शाळते कालच झालेल्या बाहुला-बाहुलींच्या लग्नाची बातमी वर्तमानपत्रात छापून आली म्हटल्यावर त्यांचं आतुरतेन, आनंदाने चष्मा लावून, थरथरत्या हातानं, भिरभिर नजरेनं वाचणं या साऱ्यात जगण्याचा आनंद ओसंडून वाहताना मी अनुभवला... या स्थितीतही वर्तानपत्रातलं शब्दकोडं सोडविणाऱ्या माईसाहेब. अतिदक्षता विभागात नाका-तोंडावर नळ्या असलेला रुग्ण शब्दकोडी सोडवतो हे पाहून तेथील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना मोठे अप्रपू वाटायचं,हे मी त्यांच्या डोळ्यातून अनुभवलं.हे सारं घडतं जीवनावरील अविचल श्रद्धेमुळं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/९०