पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आपसूक पाहायला मिळते. गुरुजींनी -रंजनाबरोबर संस्कार हे बालसाहित्याचे अभिन्न तत्त्व अंगिकारले, ते साने गुरुजी व वि. स. खांडेकरांच्या प्रभावामुळेच.
 बालसाहित्यातील कला, नाटुकली, बडबडगीते, चरित्र कादंबरिका, आठवणी इ. अनके साहित्यप्रकार गुरुजींनी हाताळले. कथालेखक म्हणून बालसाहित्यात त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या खाती जमा असलेल्या तीस कथासंग्रहांपैकी ‘रबरी फुगे', 'एक होता राजा’, ‘फजितवाडा’, ‘आचारवंत, ‘इमानी शेरू' हे उल्लेखनीय कथासंग्रह होत. या कथांमध्ये रंजकतेइतकेच उद्बोधनाचे कौशल्य असते. या संदर्भात त्यांनी लिहिलेली ‘सोनेरी मुंगूस ही कथा लक्षात घेण्यासारखी आहे. ही कथा ‘मंगल वाचन'मध्ये संग्रहित झाल्याने महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचा ती वस्तुपाठ ठरली. मध्यंतरी एका स्वातंत्र्यसैनिकाच्या सत्कार समारंभात ज्येष्ठ विचारवंत ना. ग. गोरे यांनी या कथेचा उल्लखे करून आजच्या राजकीय व सामाजिक जीवनाची चिकित्सा केल्याचे आठवते. यापेक्षा त्यांच्या कथेचा आणखी मोठा गौरव कोणता असणार?
 गुरुजींनी कुमारांसाठी सुबोध श्रीरामायणही लिहिलं आहे. गुरुजींच्या प्रकाशित पुस्तकांपैकी सर्वांत जाडजूड असलेलं हे पुस्तक प्रत्येक घरातील ग्रंथालयात यायला हवं. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण घर, शाळेप्रमाणे पुस्तके करीत असतात, अशी गुरुजींची ठाम श्रद्धा असल्यामुळे त्यांच्या सर्व कथा आदर्शवादी पठडीत बसतात. ‘वरदवंत’, ‘निष्ठावंत', 'आचारवंत', 'यशवंत', ‘पुण्यवंत' या शृंखलेतील सर्व कथा आदर्शवादी होत. संग्रहांच्या नावात ही त्यांचा आदर्श प्रतिबिंबित झाल्याचे दिसून येते.

 तारुण्याच्या शेतीची पेरणी बालसंस्काराच्या बिजातून व्हायला हवी, हे लक्षात घेऊन त्यांनी ४० कादंबऱ्या कुमारांसाठी लिहिल्या. १२ ते १६ वर्षे वयोगटातील मुले-मुली ‘चंपक', 'चांदोबा'ची दोस्ती सोडून 'किशोर', ‘अमृत', 'अपूर्व’, ‘सर्वोत्तम'कडे वळायला लागतात. या काळात मुलांच्या या मनावरची अद्भुततेची मोहिनी हळूहळू कमी व्हायला लागते. त्यांना वास्तव नि वर्तमानाची ओढ लागत असते. गुरुजींच्या वास्तवाचे भान देणाच्या ‘गुरु नानक’, ‘फ्लॉरेन्स नायटिंगले', 'देवी अहिल्या', ‘अब्राहम लिंकन', 'नेताजी सुभाषचंद्र', 'बुद्धभक्त डॉ. आंबेडकर', 'मदर तेरेसा', विश्वकवी रविबाबू, ‘राजाराणी मीरा', करुणासागर ईश्वरचंद्र, ‘इंदिरा प्रियदर्शनी' व 'मानवतेचे पुजारी शास्त्रीजी' या काही उल्लेखनीय कादंब-या गुरुजींच्या या लेखनशैलीत चरित्रास कथारूप देण्याचं एक आगळं कौशल्य आहे. शीलवतं शिवराय' हा त्यांचा एकांकिका संग्रह ‘गरिबी हटाव' हे

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/८५