पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहिले. नाशिकचे त्र्यंबक विद्यामंदिर व कोल्हापूर येथील विद्यापीठ हायस्कूल व ताराराणी विद्यापीठ ही त्यांची कार्यस्थळे. पैकी उत्तरार्धातील २५ वर्षं ते ताराराणी विद्यापीठात अखडे सेवेत होते. शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य 'अशा सतत बढतीच्या जागा मिळवून त्यांनी शिक्षण, प्रसारण क्षेत्रातील आपले कौशल्य सिद्ध केले. १४ मार्च, १९७३ मध्ये ते सेवामुक्त झाले. ही मुक्ती लौकिक होती.
 गुरुजींनी आपले महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालयात घेतले. १९३७-३८ ची गोष्ट असेल. तेव्हा ते बी. ए. शिकत होते. सतत वाचन, भाषणे ऐकणे. त्यावेळच्या छंदामुळे लेखनाची निमार्ण झाली. सुरुवातीस दैनिक पुढारीच्या रविवारीय परिशिष्टातील 'बालवाडी'साठी लिहिले. पुढे काही काळ दि. द. पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी ‘बालवाडी' हे सदरही चालविलं. बालवाडीतील सतत लेखनामुळे त्यांच्यातील लेखक आकारला. बालवाडीतील निवडक कथांचा संग्रह 'खेळणी' प्रकाशित झाला. त्यांच्या या पहिल्या कथासंग्रहास वि. स. खांडेकरांची प्रस्तावना लाभली. भाऊंच्या या प्रोत्साहनामुळे पुढे त्यांनी लेखनाचा छंद जोपासला. त्यांच्या लेखनावर सानेगुरुजी, वि. स. खांडेकर यांच्या भाषा नि आशयाची छाप सहज लक्षात येते. साने गुरुजी हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यातील लेखनाची मिणमिणती पणती सतत तेवत राहिली ती साने गुरुजींच्या लेखनाच्या सतत वाचनाने. हे ते अभिमानाने सांगतात. पुढे ते मास्टर विनायकांसारखा कल्पक कलाकार व वि. स. खांडेकरांसारख्या सामाजिक जाणीव असलले या प्रतिभावंतांच्या सहवासात राहिले. मास्टर विनायकांकडे ते पटकथा लेखनाचे काम करीत. या काळात सिनेमाचे बिलोरी विश्व त्यांनी जवळून अनुभवले. चंदेरी दुनियेतील मास्टर विनायकांच्या कितीतरी आठवणी गुरुजी नेहमी सांगतात. लतादीदी, बाबूराव पेंढारकर इत्यादींविषयीच्या काही आठवणी तर मनाचा ठाव घेणा-या आहेत. वि. स. खांडेकरांच्या आठवणीप्रमाणे त्याही त्यांनी लिहायला हव्या होत्या. मराठी चित्रपटाच्या इतिहासातील तो अमूल्य ठेवा ठरता.

 गुरुजींना वि. स. खांडेकरांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्यांचे लेखनिक म्हणून सुरुवातीस ते भाऊंच्याकडे होते. पुढे भाऊंची दृष्टी अधू झाली. त्या काळी तर गुरुजीच भाऊंचे डोळे होते. भाऊंना नित्य वाचून दाखवायचे काम ते व्रत म्हणून करायचे. भाऊंच्या साहित्यिक गप्पा, चिंतन, लेखन, सामाजिक दृष्टी यांतून गुरुजींना जे मिळाले, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/८४