पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/84

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बाल साहित्यिक : रा. वा. शेवडे गुरुजी

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf

 वय वाढत निघाले की माणसू थकत जातो नि त्याची प्रतिमाही थकते असे सामान्यपणे दिसनू येते. शेवडे गुरुजींनी हे स्थूल समीकरण चुकीचे ठरविले नसते तरच आश्चर्य!' त्यांचा साहित्यिकाचा उत्साह वाढतो आहे. वयाच्या अमृतमहोत्सवात हे आपल्या साहित्यपूर्तीचाही अमृतमहोत्सव करताहेत हे पाहिलं की अचंबा वाटतो.
 शेवडे गुरुजींनी आपल्या व्यक्तिगत नि साहित्यिक जीवनात मादाम मॉन्टेसरी, साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांना आदर्श मानले. मराठी बालसाहित्याच्या प्रांगणात १ कवितासंग्रह, ४ नाट्ये ४० कादंब-या व ३० कथासंग्रह गुणात्मक भर घालणारे ते एकमेव साहित्यिक होत. अद्भुतरम्यता, हास्यकारकता, कल्पनासौंदर्य, सुबोध व नादमधुर भाषाशैली यांसारख्या गुणवैशिष्ट्यांमुळे मुले पुस्तके निवडतात ती शेवडे गुरुजींचीच. ही निवड कोणत्याही पुरस्काराइतकीच त्यांच्या लेखनकलेचा गौरव करणारी आहे.
 गुरुजींचा जन्म १४ मार्च, १९१५ मध्ये झाला. मध्यमवर्गीय परिवार. शिक्षण हेच उद्धारांचे नि उदरभरणाचे एकमेव साधन वाटल्याने गुरुजींनी त्याची कास धरली.

 औपचारिक शिक्षणाच्या एम.ए., बी.टी.,मान्टेसरी डिप्लोमा, हिंदी कोविंदसारख्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. आपल्या नोकरीच्या कालखंडात त्यांनी शिक्षकांपासून ते प्राचार्यांपर्यंतची सर्व पदे भूषविली. पण गुरुजी या शब्दामागे येणारे आदर्श शिक्षकाचे ब्रीद त्यांनी कधीच सोडले नाही. मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्स, मुंबई येथील एक वर्षाच्या नोकरीचा अपवाद सोडल्यास सर्व सेवाकाळात ते शिक्षक म्हणून कार्यरत

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/८३