पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/83

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 अशा काळात या वर्गाचे नेतृत्व प्रश्नकेंद्रित करणे हा ऐरणीचा प्रश्न होऊन बसला आहे. 'श्रमिक सहयोग सारखी अपवाद संस्था कोकणच्या कुशीतील पिंपळी खुर्द सारख्या छोट्या गावात ‘अंधार फार झाला तरी पणती जपून आहे. तिथले 'बापूसाहेब पाटील अभ्यास केंद्र प्रयोग म्हणून सर्वत्र उभारणे हा वर्तमानातील चक्रव्यूह भेदण्याचा एक हुकमी प्रयत्न व्हायला हवा.
 बापूसाहेब पाटील यांनी धरणग्रस्त, भूमिहीन शेतमजूर, झोपडपट्टीवासी, पारधी आदींसाठीही लढे दिले. आज या सर्व आघाड्यांवर सामसूम असल्यासारखी स्थिती आहे. प्रश्नरहित समाज कधी असत नाही. आजच्या काळातील प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडविण्याचे नवे उपाय, कार्यपद्धती, लढ्याचे नवे तंत्र, कार्यकर्त्यांची घडण हे आजच्या निद्रिस्त समाजापुढचे ज्वलतं प्रश्न आहेत. बापूसाहेब पाटील यांचे आजचे स्मरण या संदर्भातील जागराचे नवे पर्व ठरावे म्हणून हा सारा खटाटोप.
  गीत नवे, मंत्र नवे, क्षितिज मोकळे

  स्वप्नांना फुटले हे पाय कोवळे|

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/८२