आज पुन्हा एकदा त्यांच्या वस्तुपाठाचा अंगिकार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आज समाजकारण ‘बुळ्यांचा खेळ' म्हणून उपेक्षिला जातोय. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सर्वाधिक गरज असले तर ती छोटे उद्यागे वाचविण्याची, रोजगारांच्या संधी सुराक्षित ठेवण्याची, शिक्षण जीवनलक्ष्यी बनविण्याची, शेतीमालास किमतीची हमी देण्याची आणि वंचित वर्गाच्या हितसंबंधाच्या रक्षणाचीही. दुर्दैवाने समाजाच्या या कळीच्या मुद्यांकडे राजकारणी हेतुतः कानाडोळा करीत आहेत. आज खरी गरज आहे ती समाजकारण केंद्रित चळवळींना बळकटी आणण्याची. बापूसाहेब पाटील यांनी उत्तरायुष्यात समाजकारणाद्वारे समाजपरिवर्तनाचा जो आदर्श घालून दिला होता, त्याचा कित्ता गिरवणे आज आवश्यकच नाही तर अनिवार्य झाले आहे. समाजकारण इतके प्रबळ व्हायला हवे की, राजकारणावर त्याचा अंकुश असायला हवा. ते बापूसाहेबांचे एक स्वप्न, एक ध्यास होता. आमशी, आरे, बीड, कुडित्रे येथे बापूसाहेबांनी दिलेले लढे या संदर्भात नव्या समाजकार्यकत्र्यांनी अभ्यासून समकालीन प्रश्नांच्या सोडवणुकीची व्यूहरचना करायला हवी.
बापूसाहेब पाटील यांनी राजकारणाचा त्याग केल्यानंतर आयुष्यभर दलित, वंचितांच्या या मानवी हक्कांची पाठराखण केली. सवर्णांनी दलितांवर जेव्हा जेव्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा बापूसाहेब तुटून पडले. दलित संघटित होतात ते पाहिल्यावर तत्कालीन धन-साधनसंपन्न सवर्णांनी दलितांवर बहिष्कार, पाणीबंदी, वाटबंदी, रोजगारबंदी, पाणझच्यात विष्ठा टाकणे, दलित महिलांना शिवीगाळ करणे अशा हरत-हने अमानषु वागणकू दिली. त्या काळात काणे त्याही पक्ष, संघटनेचा ध्वज न मिरवता बापूसाहेब पाटील यांनी 'बळीचे संघटन करून अत्याचाच्यांचे कान पिळण्याचे असाधारण कर्तृत्व करून दाखविले. बापूसाहेब पाटील हे सारे करू शकले, त्यामागे विचारांवरील अविचल श्रद्धा, मूल्यांवरचा गाढ विश्वास, सचोटी, उद्दिष्टांची स्पष्टता, ध्येयनिश्चिती या गोष्टी होत्या.
आज दलितांच्या संघटनांचे विभाजन, शोषितांच्या वर्ग संघर्षास लागलेले ग्रहण व अनाथ, निराधार, अंध, अपंगांसारख्या वंचितांचे अल्पसंख्य असणे, असंघटित राहणे, हे नव्या विश्वरचनेपुढे एक आव्हान बनून उभे ठाकले आहे. या वर्गाचे वाली कोण, असा प्रश्न आहे, सर्व राजकीय पक्ष या वर्गाकडे हक्काची, हुकमी गठ्ठा मतपेटी म्हणून पहात आहे. त्यांना या वर्गाच्या जगण्याच्या संघर्षाशी देणे-घेणे राहिले नाही.