पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आज समाजपरिवर्तन हे प्रसार माध्यमांतून होत आहे असे मानले जाते. दलित, शोषित आणि वंचितांच्या प्रश्नांचे नेमकेपण न हेरता सवंग पद्धतीने प्रसिद्धीचा भाग, साधन म्हणून प्रश्नांची हाताळणी होते असे वाटते व त्यामुळे गाभ्याचा भाग उपेक्षित राहतो आहे. ‘दलितमित्र' बापूसाहेब पाटील यांनी जीवनभर ज्या लोकचळवळीची कास धरली ती लापे पावत चालली आहे की काय, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पुनश्च एकदा सामाजिक प्रबाधे नाच्या वर्तमान स्थितीचे मूल्यांकन करून पुनर्माडणी करणे, नवे कार्यकर्ते घडविणे, नवी लोकचळवळ व लोकशिक्षणाची केंद्रे सुरू करणे ही काळाची गरज होऊन बसली आहे.
 स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यार्थी संघटना होत्या. त्या विशिष्ट वर्गाच्या मागण्यांपेक्षा व्यापक हिताच्या प्रश्नात रस घेत. स्वातंत्र्याची चळवळ मजबूत करण्याकडे त्यांचा कल होता. या सगळ्या प्रवासात भारताची उभारणी समाजवादी समाजरचनेची व्हावी असा त्यांचा ध्यास होता.त्यासाठी ते समाजवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणनूही कार्यरत होते. आजच्या विद्यार्थी संघटना व चळवळींचा वापर राजकीय हेतूंच्या पुर्ततेसाठी होत आहे. विद्यार्थीहिताचे प्रश्न तोंडी लावण्यापुरते सोडवायचे. प्रमुखत: या संघटना आज एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाची शाखा म्हणनू चालतात. विद्यार्थी संघटनांनी व्यापक हिताला वाहन घेऊन शिबिरे, व्याख्याने, श्रमदान, लोकप्रबोधनादी मार्ग चोखाळत त्या आपल्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणाच्या कार्यशाळा बनविणे ही आता काळाची गरज झाली आहे.

 स्वातंत्र्योत्तर काळात पक्षीय अभिनिवशे वाढला आहे छोट्या-मोठ्या मताग्रहांपोटी व्यापक उद्दिष्टांकडे डोळेझाक होऊ लागली. राजकारण हे समाजपरिवर्तनाचे साधन न राहता ते सत्ताप्राप्तीचे हत्यार बनले आहे. राजकारणात कार्यापेक्षा कारणाला, साध्यापेक्षा साधनांना व मूल्यांपेक्षा मतांना महत्त्व आले आहे. अशा परिस्थितीमुळे बापूसाहेब पाटील यांनी त्या वेळी राजकारण संन्यास स्वीकारून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले. प्रत्येकाची स्वतःची अशी राजकीय मतप्रणाली असते. अशा परिस्थितीत बापूसाहेब पाटील यांनी काया, वाचा, मने समाजवादी, विचारसरणीचा आजन्म पुरस्कार केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, धर्मनिरपेक्षतेसारख्या मूल्यांचे ते आचार व विचारांच्या पातळीवर सक्रिय समर्थक राहिले.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/८०