पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/80

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


समता प्रतिष्ठानची स्थापना करून समता परिषदांच्या माध्यमातून बापूसाहेब यांनी बाबा आढावांच्या 'एक गाव एक पाणवठा' चळवळीस मोठे बळ दिलं. सन १९६० ते ७० हा बापूसाहेबांच्या सामाजिक कार्याचा ‘सुवर्णकाळ म्हणावा लागेल. १९६३ ला आमशी गावी झालेल्या दलितांवरील अन्यायाच्या विरोधात बापूसाहेबांनी दिलेली पुरुषार्थ लढत सामाजिक परिवर्तनाच्या स्वातंत्र्योत्तर लढ्यातील सोनेरी पान' ठरावे. या गावच्या सुमारे ८७ हरिजन कुटुंबात मिळून जगण्याचे साधन असलेली अवघी ४0 एकर जमीन (तीही जिराईत) तेथील सवर्णांनी दांडगाईने व कायद्यातील पळवाटा शोधून हडपण्याचा प्रयत्न केला. त्यातून झालेल्या संघर्षात चार खून झाले. दलितांना अपराधी ठरवले गेले. पण सामाजिक अन्यायांना पुरावे व साक्षीदार न मिळण्याचा शाप असतो म्हणे. बापूसाहेबांनी या दलितांचं नेतृत्व केलं. हरिजन परंपरेने सवर्णाचे दास असायचे. मयतांचे निरोप देणे, मेलेली ढोरं वाहून नेणे यासरख्या अमानुष चालिरीतींना बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली दलितांनी विराधे केला. त्यातनू हरिजनांचा छळ सुरू झाला. हरिजनांचे जाण्या-येण्याचे रस्ते बंद करणे, त्यांना पिण्याचे पाणी मिळू नये म्हणून गावबंदी करणे, एकट्या दुकट्या हरिजन स्त्रीस गाठून अचकट विचकटं हावभाव करणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारचे अनन्वित अत्याचार झाले. पुढे हरिजन शेतमजुरांनी संप केला. अशा प्रकारचा हा देशातील पहिला संप होय. याची नोंद तत्कालीन केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांनीही घेतली होती.
 आरे गावातील हा लढा बापूसाहेबांच्या दूरदृष्टीचे प्रतीक होय. आमशीच्या लढ्यात तर सरकारला नामुष्की पत्करायला लागून भरपाई द्यावयास लागली होती. न्यायालयातील कायदेशील लढाई सवर्णांच्या कावेबाजीने हररले तरी बापूसाहेबांनी सामाजिक न्यायाच्यातत्त्वावर सनदशीर मार्गाने जिंकून हरिजनांना जमिनी परत मिळवून दिल्या.

 महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षात बापूसाहेबांनी कोल्हापूर ते सांगली अशी निवडक कार्यकर्त्यांची पदयात्रा योजून श्री. वसंतदादा पाटील यांना निवेदन देऊन गांधीजींचा जीवन संदेश अंमलात आणण्यासाठी म्हणून २५ कलमी कार्यक्रम सादर केला होता. असेच निवेदन त्यांनी १०१ कार्यकर्त्यांचा पायी मोर्चा योजून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना दिले होते. या धडपडीतूनही बापूसाहेबांची महात्मा गांधींच्या विचार व कार्यावरील श्रद्धा तर व्यक्त होतेच, शिवाय ते अंमलात आणण्याचा आग्रहही स्पष्ट होतो.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/७९