पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/79

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 त्या काळात राजकारण असो की समाजकारण ही काही मिळकतीची क्षेत्रे नव्हती. ते लष्कराच्या भाकऱ्या भाजणेच होते. पण त्यात मोठा आनंद होता. तत्कालीन समाजकल्याण मंत्री दादासाहबे रुपवते यांनी त्यांच्या कामाचे मूल्यांकन करताना म्हटले होते की, ‘इकडच्या महार समाजाने बाबासाहेब आंबेडकर व राजर्षि छ. शाहूनंतर कुणाचा जयजयकार केला असेल तर तो बापूसाहेब पाटलांचा. तो प्रसगं म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची एका दृष्टीने मिळालेली पावती होती. आज आपला देश विभाजनाच्या उंबरठ्यावर येऊन ठाकला आहे. एक काळ असा होता की, केरळमधील एका छोट्या घटनेनेही कोल्हापूर बंद' पुकारला जायचा व तो यशस्वी व्हायचा. आज हा सर्व व्यवहार बंद झाल्याचे लक्षात येते. ही एकता आज राहिली नाही. आत्यंतिक भाषावाद, प्रांतीय संकुचितता, पक्षीय मर्यादांत आपण गुरफटलो आहोत हे सारं पाहून बापूसाहेबांना कधी कधी निराशा येते, पण लीलाताईंच्या कामात मिळणारं यश पाहिलं की त्यांची व्यक्तिगत मरगळ दूर होते.
 सन १९५५ ला बापूसाहेबांनी विचारपूर्वक राजकीय संन्यास स्वीकारून समाजकारण करायचे ठरवले. या काळात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहबे आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन, कार्य, विचार, साहित्य याचा सखाले अभ्यास केला होता. इतिहास हा बापूसाहेबांचा आवडता विषय. आजही ते दुर्मीळ ऐतिहासिक ग्रंथ मिळवून वाचून आपला व्यासंग जोपासताना मी पाहतो, तेव्हा त्यांच्या अध्ययनशील वृत्तीचे कौतुक वाटल्यावाचून राहात नाही.
 सन १९४६ ला म्युनिसिपल कामगार संघटनेची स्थापना करून कार्य करताना जेव्हा त्यांनी दलित कामगारांची दुरवस्था अनुभवली त्यातून त्यांनी ‘दलितोद्धार’ हेच आपले जीवन कार्य ठरवले.

 वेळोवेळी दलितांवर होणाच्या अत्याचारांचा निषेध करणे, दलितांच्या संघटना बांधणे, दलितांसाठी कार्य करणाच्या राजकीय चळवळींना समर्थन देणे, झोपडपट्टीवासीयांचे लढे उभारणे, फासेपारधी समाजावर होणारे पोलिसी अत्याचार दूर करणे, अशा स्वरूपाच्या कामास बापूसाहेबांनी स्वतःस समर्पित केले. राष्ट्रसेवा दल, सर्वोदय, समाजवादी पक्ष, जनता पक्ष, कोरगावकर ट्रस्ट अशा अनके संस्था, संघटना, कार्यकत्र्यांच्या मदतीने त्यांनी वेळोवेळी लढे उभारले व ते यशस्वी करून दाखवले. व्यंकाप्पा भोसले, आबा कांबळे, बाळासाहेब कांबळे, दत्ता जाधव अशी अनेक नावे सांगता येतील की जी सारी मंडळी बापूसाहेबांच्या लढ्यातून उदयाला आली. महात्मा फुले

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/७८