पुढे लीलाताई सरकारी सेवेत गेल्या. त्यामुळे अकोला, पुणे अमरावती, रत्नागिरी, कोल्हापूर अशा अनके ठिकाणी बदल्या होत गेल्या. बापूसाहेब बहुधा कोल्हापूरलाच असायचे. कार्यक्षेत्र सोडायचे नाही, हे उभयतांच्या संमतीने ठरलेली गोष्ट होती. यात त्यांच्या गृहस्थी जीवनाची ओढाताण सतत हाते राहिली. त्यांचा मुलगा बाळ याच्याकडे फारसे लक्ष देता आले नाही. त्याचे सारे लीलाताईंनीच केले. बापूसाहेबांनी जगाची मुले सांभाळली पण आपला मुलगा सांभाळू शकलो नाही याचे दु:ख त्यांना अनावर करत असायचे. पालक म्हणून मनातील अपराधी भावना मुलाच्या अपघाती निधनानंतर तर त्यांच्या या मनात प्रबळ झाल्याची जाणवते. त्यांच्या जाण्याने लीलाताईंच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली. पण लीलाताईंनी मोठ्या धैर्याने स्वतःस सावरलं!
बापूसाहेब बी. ए.,एलएल.बी. झाले. लीलाताई बी. ए., एम. एड. झाल्या. शासकीय सवे ते सर्वोच्च पद मिळत असताना पदावनती घेऊन लीलाताईंनी अध्यापनाचे कार्य करणे पसंत केले. लोक त्यांना कुशल प्रशासक म्हणून मान्यता देत असले तरी प्रशासक होण्याचे टाळून हेतू त्या प्राध्यापक, प्राचार्या झाल्या. अध्ययन, अध्यापन, लेखन, संशोधन ही त्यांची आवडीची क्षेत्रे. प्रशासकीय कार्य त्यांनी केले. पण त्यात त्या फारशा रमल्या नाहीत. शासकीय सेवेत अनेकदा वरिष्ठांचा रोष त्यांना पत्करावा लागला. पण त्यांनी कधी विचार व व्यवहारात फारकत येऊ दिली नाही.
या उभयतांनी आपापल्या क्षेत्रांत झोकू न द्यायचे ठरवले व ते शेवटपर्यंत निभावले. त्यांच्या संसाराच्या यशाचे सारे श्रेय लीलाताईंना द्यावे लागेल. बापूसाहेब बेशिस्त. लीलाताई घरी-बाहरे शिस्तीच्या भोक्त्या. बापूसाहेब बेहिशोबी (नि अव्यवहारी), त्या हिशेबी. मध्यमवर्गीय काटकसरीच्या संस्कारात त्या वाढल्या. लीलाताईंची काटकसरच त्यांचा संसार पार करू शकली.
त्यांच्या विवाहानंतर उभयतांच्या घरच्यांचे एकमेकांशी संबंध राहिले, पण जाणे-येणे फारसे राहिले नाही. त्यांचे खरे कुटुंब कार्यकर्त्यांतूनच वाढले व विकसित होत गेले. जीवनाच्या अनेक प्रसंगात या जोडलेल्या आप्तांचे मोठे साहाय्य झाले.
इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहताना लक्षात येते की, स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे महत्त्व पटले ते सुराज्य करण्याच्या ध्यासामुळे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात 'एकता' ही त्यांना अधिक महत्त्वाची वाटत आलेली गोष्ट होय. संगठन, संघर्ष, सर्वांतून त्यांना त्याचे महत्त्व उमगले.