पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘डिक्टेटर' म्हणनू प्रचलित होते. पुढे या युनिनयनमध्ये फूट पडून जहाल मंडळी कम्युनिस्ट लाल निशाण पक्षाच्या वाटेनं गेली. या मंडळींवर क्रांतिकारी भगतसिंगाच्या रेव्होल्यूशन आर्मी'चा प्रभाव होता. बापूसाहेबांनी गांधीजींच्या शांततामय मार्गाचा स्वीकार करून समाजवादी काँग्रेसचे सभासद होणं पसंत केलं. या विचाराच्या विद्याथ्र्यांनी 'डेक्कन स्टुडंट युनियन' स्थापली. बापूसाहेब त्याचेही जनरल सेक्रेटरी झाले. या काळातली सर्व आंदोलनं, चळवळी, सत्याग्रह बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
 विद्यार्थी चळवळीतील बैठका, शिबिर, मेळावे, गुप्त खलबतं यात मुलींचा सहभाग अपवादात्मक होता. लीला फडके या त्यापैकी होत. त्यांची धडाडी पाहून बापूसाहेब त्यांच्याकडे आकर्षित झाले. पुढे बापूसाहेबांचा त्यांच्याशी प्रेमविवाह झाला. तो त्या वेळचा अशा प्रकारचा पहिला । आंतरजातीय विवाह होय.
 सन १९४५ ला त्यांचा विवाह झाल्यानंतरचा पहिल्या दहा वर्षांचा काळ कौटुंबिक संघर्षाचा जसा होता, तसा तो विचार व व्यवहाराच्या घालमेलीचाही होता. नोकरी करायची नाही हे बाप साहेबांनी ठरवलेलं. तसेच ते बी. ए., एलएल. बी. झालेले म्हटले तर जमीनदाराचे वकील होऊन सहज बस्तान बसवता आलं असतं. पण मळलेली वाटचालायची नाही हा त्योचा स्वभाव, स्वातंत्र्य, स्वराज्याचा हुंकार हुंगलेल्या बापूसाहेबांनी आजीवन निर्वेतन कार्य करण्याचं ठरवलं. शेवटपयर्तं ते निभावलं. त्यांचं या पत्नी लीलाताई पाटील यांच्या खंबीर साथीमुळेच हे शक्य झालं.
 सन १९४०-४२ चा काळ आठवतो. बापूसाहेब तसेच काही तरुणतरुणी त्या वेळी विद्यार्थी सघंटनेत सक्रिय होते. भारत छोडो' आंदोलनाचे वातावरण तापत होते. महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी संघटनांपेक्षा कोल्हापूर येथील विद्यार्थी संघटना सक्रिय व आक्रमक होती. सांगली येथील एका व्याख्यानात सर्वश्री बाळासाहेब खेर, युसूफ मेहरअल्ली, सरदार पटेल प्रभृतींनी त्यांच्या कामाची जाहीर प्रशंसा केल्याचे ऐकून आहे. त्या वेळी आंदोलनासंबंधी वेगवेगळ्या कार्यक्रमासंदर्भात त्यांच्या संघटनेच्या गुप्त बैठका होत. सर्वश्री ह. रा. महाजनी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ना. ग. गोरे आदींचे अशा बैठकांना मार्गदर्शन लाभले.

 सन १९४५-४६ चा काळ आंतरजातीय विवाहांना अनुकूल खचितच नव्हता. त्यांच्या उभयतांच्या घरात अशा निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. बापूसाहेबांचे घराणे कर्मठ जैनधर्मीय. कर्मवी भाऊराव पाटील त्यांचे मामा. पण घरी पारंपरिकतेचे समाजभय व दडपण होतेच. तिकडे तकड लीलाताईंचे

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/७५