पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/75

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


दलितमित्र : बापूसाहेब पाटील

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf

 बापूसाहेबांचा जन्म २६ नोव्हेंबर, १९१९ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण कोगनोळीत झालं. माध्यमिक शिक्षणासाठी म्हणून ते कोल्हापुरात आले. पुढे कोल्हापूरच त्यांची कर्मभूमी झाली. विद्यार्थिदशेपासूनच ते सार्वजनिक जीवनाकडे ओढले गेले. त्यामध्ये त्यांचे मामा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फार मोठा वाटा होता. कर्मवीर आण्णा कोल्हापुरी आले की, बापूसाहेबांना त्यांचा घरगुती सहवास लाभायचा, शिवाय संस्कारही. घरी मोठमोठ्यांची उठबस होत राहायची. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात त्यांचे रूपांतर धडाडीच्या नेत्यात झालं. अळीचं फुलपाखरू होतं तसं!

 १९३४-३७ च्या दरम्याच्या प्रांतिक स्वराज्य चळवळीने जनतेत राज्यशकट चालविण्याची आकांक्षा निर्माण केली. सन १९४२ च्या लढ्यात या महत्त्वाकांक्षेचं रूपातंर स्वयंपूर्णतेत झालं मबंई इलाख्यात बाळासाहबे खरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांतिक सरकारची स्थापना हाऊ न काँग्रेसच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालले होते याचा फार मोठा परिणाम विद्यार्थी व तरुण वगार्त आत्मविश्वास व उभारी निमार्ण होण्याच्या दृष्टीने झालेला. बापूसाहेब पाटील, यशवंत चव्हाण, वसंत नाईक, मनोहर बागी, डेव्हिड डिसिल्वा, लीला फडके प्रभृती तत्कालीन तरुणांनी 'स्टुडंटस् युनियन'ची स्थापना करून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होण्याचे ठरविले. बापूसाहेब या युनियनचे जनरल सेक्रेटरी झाले. घटनात्मक सर्वाधिकार असलेलं हे पद

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/७४