पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/65

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


एका पत्रात त्यांनी केशवरावांना लिहिले आहे की, “आपले दोष दिग्दर्शन सौम्य झाले आहे हे मी जाणून आहे. पण निर्जीव स्नेहदेखील जिथे मृत्युत्वाबद्दलच प्रसिद्ध आहे, तिथे सहृदयाचा स्नेह अकारण मृत्यू व्हावा यात नवल काय? (१) रसहानिकारक रहस्ये (२) विनोदी पात्रांची लांबण (३) कोटिक्रमाचा अतिरेक हे तिन्ही दोष कोल्हटकर-गडकऱ्यांच्या परंपरेत माझे लेखन वाढल्यामुळे उत्पन्न झाले आहेत. देवल-खाडिलकरांच्या औषधाने हे विष निरुपद्रवी करण्याचा मी यापुढे शक्यतो प्रयत्न करणार आहे.
 वि. स. खांडेकरांचा जन्म व बालपण नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाच्या सांगलीत गेले. देवल, खाडिलकरांसारखे नाट्यक्षेत्रातील पूर्वसुरी व कोल्हटकर-गडकरी यांच्यासारखे त्याचे समकालीन ज्यष्ठे साहित्यकार याचं या नाट्यवाचन व रगं भूमीवरील त्यांच्या नाटकांचे सादरीकरण पाहून आपणही नाटककार व्हावे असे स्वप्न खांडेकर बालपणापासून पाहायचे. ‘शनिमहात्म्य' वाचून त्यावर आधारित नाटक लिहिण्याचा प्रयत्न खांडेकरांनी केल्याचे उल्लेख आढळतात. पुढे १९१८-१९ च्या दरम्यान पुणे सोडून कोकणात आल्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते बांबुळीत होते. निवातंपण होते. लेखन, वाचनाशिवाय पयार्य नव्हता. त्या वर्षभराच्या कालावधीत व नतंरच्या तीन-चार वर्षांत हौस म्हणून त्यांनी ‘शीलशोधन', 'मोहनमाळ', ‘शांतिदेवता, ‘मृगलांच्छन, 'स्वराज्याचं ताट' सारखी नाटके लिहून ती समकालीन नाटककारांना अभिप्रायार्थ पाठवली होती. या सर्वांतून खांडेकरांचा प्रारंभिक लेखन पिंड हा नाटककाराचा होता हे स्पष्ट होते. पण तो काळ (१९२०-३0) हा मराठी संगीत नाटकांच्या ओहोटीचा असल्याने एक प्रकारे तो संधिकाल होता. नाट्य कंपन्या बंद पडत होत्या. राजाश्रय संपत आलेला. चित्रपटांच्या आगमनामुळे नाटकांचा जनमानसावरील प्रभाव कमी होत चाललेला. त्यामुळे खांडेकर कथा, कादंब-यांकडे वळले असावेत.

 ‘संगीत रंकाचे राज्य'चा मुख्य विषय स्थानिक स्वराज्य असला तरी त्यात स्त्रीपुरुष प्रीतीभाव, प्रेमातील संयोग-वियागे इ.चे चित्रण त्यात प्रभावीपणे आले आहे. हे मूलतः संगीत नाटक असल्याने यात २५ गाणी आहेत. नाटकाची शैली कोटीबाज, विनोदाकडे झुकणारी. Dramatic Irony असं प्री. प्र. ना. परांजपेंसारखे समीक्षक त्याचे वर्णन करतात. खांडेकर नाटककार जरी होऊ शकले नाही तरी नाट्यसमीक्षक म्हणून पुढे त्यांचा लौकिक झाल्याचा आढळतो. एवढे मात्र खरे की, नाटक हा त्यांच्या वाचन व व्यासंगाचा विषय होता. पुढे खांडेकरांनी तो जन्मभर जपला.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/६४