पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साहित्य लेखन केलं. वि. स. खांडेकरांचा पहिला लघुनिबंध ‘वैनतेय' च्या २२ फेब्रुवारी, १९२७ च्या अंकात ‘रानफुले' सदरात ‘निकाल द्या' (How's that) शीर्षकाने प्रकाशित झाला होता. लघुनिबंधकार म्हणून खांडेकरांनी मराठी साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची गंगोत्री 'वैनतेय' होती. पाच दशके खांडेकर लघुनिबंध लिहीत राहिले. या काळात त्यांनी सुमारे पावणे दोनशे लघुनिबंध लिहिले.
 वैनतये साप्ताहिक डेमी आकारात (Tabloid) छापलं जायचं. त्या काळी विविध वृत्त, धनुर्धारी नवयुग नियतकालिके याच आकाराची असत. ‘वैनतये'मधील वैविध्यपूर्ण लेखनामुळे साहित्यिक, संपादक, समीक्षक, स्तंभलेखक म्हणून वि. स. खांडेकरांचा लौकिक सर्वदूर पसरला. या संपादन कार्यामुळे वृत्तपत्र हे लोकजागृतीचे व लोकशाही शिक्षणाचे प्रभावी साधन असल्याची खात्री खांडेकरांनी झाली. शाळेप्रमाणचे वर्तमान पत्र हे सांस्कृतिक साधन वाटू लागले. ‘वैनतेय'च्या माध्यमातून खांडेकरांनी जातीय सलोखा, प्रबोधन, समाजास पुरोगामी बनविण्याचे कार्य केले. गैर गोष्टींवर प्रहार करण्यात ‘वैनतेय'नं कधी कुचराई केली नाही. सद्सदविवेकाचा कौल सार्वजनिक जीवनात निमार्ण करण्याचं कार्य ‘वैनतेय'मुळे खांडेकर करू शकले. ‘वैनतेय'चं ग्राहक क्षेत्रे मर्यादित असलं तरी त्याचा वाचक, ग्राहक चोखंदळ व चिकित्सक होती. त्यामुळे बुद्धिवादी व विवेकशील वर्गाशी आपल्या साहित्याद्वारे खांडेकर नाळ जोडू लागले.
 अंधश्रद्धा निर्मूलन विचारास हातभार लावून खांडेकरांनी समाज पुरोगामी व वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न केला.
 वि. स. खांडेकरांना लेखनाचा छंद बालपणापासूनचाच. पण त्यांचं लेखन सन १९१९ पासून विविध नियतकालिकांत प्रकाशित होत होतं. उद्यान, नवयुग, वैनतेय, ज्योत्स्नासारख्या नियतकालिकांतून प्रकाशित होत राहिलं. कथा, कविता, विनोद, परीक्षण, लेख असं त्याचं स्वरूप असायचं. पण पुस्तक रूप प्रकाशन होण्यास मात्र १९२८ वर्ष उजाडावं लागलं.

 त्याचं असं झालं की, सन १९२६ मध्ये माधवराव जोशी यांनी ‘म्युनिसिपालिटी' हे नाटक लिहिलं होतं, ते रंगमंचावरही आलं. प्रेक्षकांच्या पसंतीसही ते उतरलं. पण त्या नाटकामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची काळी आणि डावी बाजूचे तेवढी प्रकाशात आली. या संस्थेचे कल्याणकारी व विकासाचे कार्यही महत्त्वाचं आहे व ते समाजापुढे यायला पाहिजे असं बाबासाहेब परांजपे या प्रसिद्ध सामाजिक कार्यकत्र्याला वाटलं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/६२