पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


एक आजारी विद्यार्थी खांडेकर मास्तरांना बघायचा घोशा लावतो व खांडेकर त्याच्या इच्छेचा आदर करतात. अशा अनेक कहाण्यांतून खांडेकरांचं विद्यार्थी प्रेम सिद्ध होतं.
 खांडेकर वेगवेगळ्या प्रसंगी विद्यार्थ्यांसमोर भाषणे करीत. त्यातून विद्याथ्र्यांचे अनुभव विश्व रुंदावयाचं. स्नेहसंमेलन, वाद-विवाद, प्रदर्शन, थोरामोठ्यांच्या भेटी, त्यांची विद्यार्थ्यांशी हितगुजं, पुस्तकांवर चर्चा, ग्रंथालयाचा विकास अशा चतुर्दिक मार्गांनी ते विद्यार्थ्यांना अधिकाधिक देऊन अभ्यासाबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची काळजी घेत. काकासाहेब कालेलकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, न. चिं. केळकर, बा. भ. बोरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा कितीतरी महनीय व्यक्ती त्यांनी शाळेत आणल्या व विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणला.
 गावातील राजकारणात भाग घ्यायचं त्यांनी कटाक्षाने टाळलं. तरी काही मंडळी विरोध करत राहायची. खांडेकरांनी शेवटपर्यंत शाळेस संस्कार केंद्र म्हणून सुरक्षित व अलिप्त ठेवलं. त्यामुळे त्यांची शाळा माणूस घडविणारं संस्कृती केंद्र बनून राहिली| पुणे सोडून सावंतवाडीला आल्यानंतरच्या काळात वि. स. खांडेकरांनी साहित्य क्षेत्रात लेखन, व्याख्याने, वाचनालय इ. स्वरूपात जे प्रयत्न नि धडपड सुरू केली होती त्या १९१९ च्या दरम्यानच्या काळात भेटलेला ध्येयवादी मित्र मेघ:श्याम शिरोडकर.
 त्यानं महात्मा गांधींच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शिक्षण सोडून राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली होती. पुढे तो पुण्याच्या राष्ट्रीय शिक्षण देणाच्या टिळक महाविद्यालयातून पदवीधर झाला. परत गावी आला. तेव्हा सावतवाडी संस्थान होते. लोकांचा कैवार घेणारं, त्यांची दुःखं वेशीवर टांगणारं, संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारं वृत्तपत्र असावं असं त्यांच्या मनानं घेतलं आणि एक साप्ताहिक प्रकाशित करायचं ठरलं. खांडेकरांनी लेखन साहाय्य करण्याचे मान्य केलं. खांडेकर त्या वेळी आत्मरंजनासाठी काव्य, विनोद, कथा असं लिहीत होतेच. त्याला प्रकट व्हायला आणखी एक माध्यम मिळाल. 'वनैतये 'च्या पहिल्या अंकापासून ते १९३२ पयर्तं त्यांनी नियमित लेखन केलं.

 मेघ:श्याम शिरोडकर वैनतेय'चे संपादक झाले तर वि. स. खांडेकर सहसंपादक वाङ्मय विभागाचे ते मुख्यतः संपादक असले तरी साप्ताहिकाची जी गरज पडेल ते लेखन त्यांनी केलं. मुद्रणाची जबाबदारी भाऊसाहबे सप्ते यांच्यावर सोपविण्यात आली.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/६०