पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजशील साहित्यिक : वि. स. खांडेकर

 भारतीय साहित्यावर मराठी भाषेची नादमुद्रा उठविणारे पहिले मराठी साहित्यिक म्हणून वि. स. खांडेकरांना ओळखलं जातं. विसाव्या शतकात स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि लाके शाही या पचं शील तत्त्वांना बांधील राहन त्यांनी लेखन केले. धर्मांधता, जातिभदे, स्त्री-पुरुष असमानता, अधं श्रद्धा, दारिद्र्य, अज्ञान इ. विसाव्या शतकातील प्रश्नांना प्रमाण मानून त्यांनी त्यांची उकल साहित्याद्वारे प्रभावीपणे केली. यासाठी वि. स. खांडेकर हे समाजशील साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कथा, कादंबरी, रूपक कथा, लघुनिबंध, नाटक, काव्य, पत्र, समीक्षा, अनुवाद, संपादन, व्यक्तिचित्रण, पटकथा लेखन इ. साहित्यप्रकारात केवळ भरच घातली असे नव्हे तर त्यांनी रूपक कथा, लघुनिबंध, अलंकारांचे सौंदर्य व शैलीचे सुभाषित मार्दव विकसित केले. या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या समग्र साहित्यास सामाजिक चिंतनाचे रूप लाभले. पिढ्या घडवण्याचे कार्य करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांत वि. स. खांडेकरांचा समावशे होतो तो या यागे दानामुळेच. त्यांनी आपल्या साहित्यातून रामायण, महाभारत, पचं तत्रं , पुराण इ.मधील मिथकांचा द्रष्टा उपयोग करून घेतला. इतकेच नाही तर त्यांचा समकालीन परिस्थितीशी अन्वय लावून नवा अर्थ सांगितला. 'ययाति' कादंबरी हे त्याचे बोलके उदाहरण होय. यामुळे वि. स. खांडेकरांचे साहित्य केवळ मराठी व महाराष्ट्रीय न राहता ते भारतीय आणि वैश्विक बनले. या त्यांच्या साहित्याच्या अभिजात कसोटी व कौशल्यामुळेच त्यांच्या साहित्य व चित्रपटांचे अनुवाद हिंदी, तमिळ, तेलगूमध्ये झाले. गुजराती, तमिळ,

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/४९