बिल्डरनी करारपत्रास फ्लॅटची उंची ११ फूट लिहिलीय, प्रत्यक्ष ती १० फूटच आहे, अमुक दुकानातून साडी घेतली, धुतली आणि अर्धावार आटली, संगणक खरेदी केलाय, ब्रँडचे पैसे घेतलेत नि असेंबल्ड दिलाय, बटाट्याचं बियाणं घेतलंय अन् पीक पडलंय... किती प्रकारे फसवणूक.
जितके व्यापारी, व्यावसायिक तितके फसवणुकीचे प्रकार... असं ऐकताना वाटतं राहायचं. प्रा. भांडारी लगेच ग्राहक न्यायालयात धाव घ्यायचे. महाराष्ट्रभर प्रत्यके जिल्ह्यात ग्राहक संरक्षण कक्ष सुरू करणे, ग्राहक न्यायालय सुरू करणे यासाठी त्यांनी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून अभय दिलं. 'ग्राहकास राजा' बनवणारा हा राजपुरोहित! प्रा.श्रीश भांडारी हे संस्कृतच्या नामवंत प्राध्यापक डॉ.विश्वनाथ श्रीराम भांडारी यांचे कनिष्ठ चिरंजीव. नागपूर विद्यापीठातून ते अर्थशास्त्र घेऊन एम.ए.झाले. वडील कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणनू आले नि त्यांनी कोल्हापुरात राहायचं ठरवलं.श्रीश भांडारी येथील महावीर विद्यालयाच्या बी.एम.रोटे कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.अल्पावधीत ते विद्यार्थीप्रिय झाले.व्यावसायिक शाश्वतीसाठी त्यांना बी.एड.किंवा डी.एच.ई.होणं आवश्यक होतं. त्यांनी डी.एच.ई.व्हायचं ठरवलं! डी.एच.ई.साठी त्यांनी प्रबंध लेखनासाठी म्हणून ग्राहक हितरक्षण' विषय निवडला नि तो त्यांचा श्वास बनला. अक्षरशः अगदी शेवटच्या श्वासापयर्तं!... सोमवारी ते औरंगबादहून ग्राहक परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीचं आन्हिक संपवून आले ते मरण ओढवूनच!
प्रा. भांडारी एक अजातशत्रु व्यक्तिमत्त्व होतें समाजहिताचं कार्य करत असताना‘डोक्यावर बर्फ आणि जिभेवर खडीसाखर' ठेवून काम करणं फार थोड्यांना जमतं. त्यापैकी श्रीश भांडारी एक होते. कुणाबद्दल पुढे अथवा माघारी गरळ ओकताना या माणसाला अपवाद म्हणूनही ऐकलं नाही. जिभेचा विटाळ होऊ न द्यायचं, सरांचं गुणवैशिष्ट्य केवळ अनुकरणीय!... कोणतंही काम त्यांच्यावर सोपवा, नाही शब्द कधी यायचा नाही. कॉलेजमध्ये तर ‘कुणीही यावे, सरांना काम सांगून खुशाल बसावे' असा रिवाजच होऊन बसलेला. त्यांच्या जाण्यानं अनेकजण अनेक प्रकारे अस्वस्थ झाले. ग्राहक चळवळीचा खंदा कार्यकर्ता गेला!- एक सन्मित्र गेला! एक सत्शील कार्यकर्ता निमाला!!!- या नि अशासारख्या औपचारिक ठोकळेबाज श्रद्धांजलीपेक्षा एक उमदा सहकारी हरपल्याचं कार्यकर्ता म्हणून मला होणारं दुःख अधिक सामाजिक महत्त्वाचं वाटतं!... रोज खुजा होते जाणारा माणूस