पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्या साऱ्या वर्तनव्यवहारांची आपण नव्याने मांडणी करायला हवी. अन्यथा असे एकेक दीपस्तंभ काळाच्या उदरात बघता बघता गडप होतील नि मग आपण अंधारल्या जगात पणती घेऊन आदर्श धुंडाळत राहू. अशी शोकांतिका व्हायची नसेल तर समाजाने न्यायमूर्ती नेवगींसारख्या दुर्मीळ चारित्र्यवान असलेल्या, समाजाला आदर्शवत असलेल्यांचे, परंपरा जोपासायला हवी. न्यायमूर्ती नेवगींना उत्तम आयुरारोग्य अशासाठी लाभायला हवं की, आपल्या भोवती सर्वत्र अनैतिकता, भ्रष्टाचार, बेइमानीचे मळभ असं भरून येत आहे की, नैतिकतेचे नंदादीप तेवत राहण्याची धुकधुकी वाटते. नाही चिरा, नाही पणती...' म्हणणाऱ्या कवीने नेवगींसारखी चरित्रचे आपल्या काव्याची प्रेरणास्राते मानली होती. आज आपल्या जीवनाचे प्रेरणास्रोत आपल्याला साद घालत आहे. नव उभारणीसाठी, नव रचनेसाठी.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१५२