पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रख्यात व्यंग चित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या लक्ष्मणरेषा' या आत्मस्मृतीपर चरित्रग्रंथात 'विसंगती नसलेली माणसं व्यंग करायला एक आव्हान असतं,' असं म्हटलयं. अशी आव्हानात्मक चरित्र नि चारित्र्याची माणसं समाजमनास न्याय, नैतिकतेचे आवाहन करण्याचा अधिकार बाळगून आहेत, म्हणून आदर्श मूल्यांची समाजात रोज रुजवण होत राहते. अन्यथा, हा समाज मूल्यहीन वाळवंटच झाला असता.
 न्यायमूर्ती नेवगी हे तसे मूळचे बेळगावचे. तिथचे वाढले, शिकले कला शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी विधी शाखेत प्रवेश घेतला. बेळगावच्या लॉ कॉलेजातून ते एलएल. बी. झाले. तिथेच त्यांनी वकिली सुरू केली. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारची प्रकरणे ते चालवत. पुढे १९६२ ला ते शासनाच्या विधी सेवेत दाखल झाले. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले. आपल्या कार्यकालाचा मोठा कालखंड त्यांनी कोल्हापुरात व्यतीत केला. प्रख्यात व्यंग चित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या लक्ष्मणरेषा' या प्रख्यात व्यंग चित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या लक्ष्मणरेषा' या प्रख्यात व्यंग चित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या लक्ष्मणरेषा' या कोल्हापुरातून ते १९८३ च्या दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले.
 न्यायाधीश म्हणून कार्य करीत असताना त्यांचा न्यायालयाच्या वर्तुळात विलक्षण दबदबा होता. विशेषतः अपराधी वर्गामध्ये त्यांची मोठी जरब होती. नेवगींच्यापुढे केस चालणार म्हटले की जबर शिक्षा ठरलेली. त्यांनी आपल्या कार्यकालात हा- ताळलेले अनेक खटले व निकाल महाराष्ट्रभर गाजले. अभिनेत्री पुष्पा भोसले खून खटला (१९८१), हेलें खून व सांगली बँक दरोडा खटला (१९८३) यापैकी होत. या खटल्यांच्या निकालामुळे ते ‘जबर शिक्षा देणारे न्यायाधीश' (Conviction Minded Judge) म्हणून ओळखले जात. पण ते खरे नव्हते. त्यांच्या हातात काही ‘वॉशिंग्टनची कु-हाड' नव्हती. त्यांनी कुणाला कधी सूडबुद्धीने, आकसाने शिक्षा नाही दिली. पण अपराधी वृत्ती समाजात नियंत्रितच हवी, अशी त्यांची धारणा होती नि आहे. त्यांच्या अनेक निकालानंतर शिक्षा झाल्यावरही पश्चात्तापदग्ध आरोपींनी भर न्यायालयात साष्टांग दंडवत घातल्याचे अनेक जण सांगतात. त्यांच्यातील त्यांतील ‘निरक्षीर न्यायवृत्तीस आणखी कोणता दृष्टान्त हवा?

 अलीकडे उठसूठ अटकपूर्व जामीन घेण्याची प्रवृत्ती बळावते आहे. बहुधा अर्ज केला की तो मिळतो असे दिसून येते. नेवगींनी अपवादाने असे अर्ज मंजूर केले.ते परिस्थितीजन्य मूल्यांकन करीत. अर्जदार अपराधी वाटला तर ते असे अर्ज नामंजूर करीत. आज अपराधी उजळ माथ्याने फिरतात.त्यामुळे न्यायपद्धतीच्या पुनर्मूल्यांकनाची मागणी जोर धरते आहे. कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करण्याची, पळवाटा शोधून अपराध्यांना

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१49