असेच प्रयोग त्यांनी कुक्कुटपालन,शेळीपालन, मधमाशीपालन, मत्स्यपालन, रेशमी किड्यांची पैदास आदी क्षेत्रांत केले. कुक्कुटपालन व मत्स्यपालनाची सांगड घालून खाद्यान्नाच्या बचतीचा दाभोळकरांनी केलेला प्रयोग समजून घेण्यासारखा आहे. शेळीपालनातील त्यांचा प्रयोग तर त्यांना जागतिक कीर्ती देऊन गेला.
गारगोटीच्या बाजारात विक्रीला आलेली शेळीची पिलं, त्यातून दाभोळकरानी एक शेरडू खरेदी केलं. त्याला हिरव्या पाल्याऐवजी प्रथम केळीचे ओले सोप, अर्धे ओले सोप, वाळलेले सोप व नंतर कागद खायला शिकवलं. हिरव्या चाऱ्याशिवाय शेळी वाढवली. ती दुभती झाल्यावर तिचं दुध हिरवा चारा खाणाऱ्या शेळीपेक्षा सरस असल्याचं वैज्ञानिक निकषावर दाखवनू दिलं. डेन्मार्कच्या जगप्रसिद्ध नॅशनल डेअरीनं त्यांच्या या प्रयोग लेखनास घसघशीत मानधन देऊन जगमान्यता मिळवून दिली. या लेखाचं आलेलं मानधन पाहून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन प्रयोगाला वाहून घेतलं. आजच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेचे (व्हीआरएस) प्रा. दाभोळकर हे आद्य प्रणेते ठरले, असे किती प्रयोग वर्णावे?
प्रा. दाभोळकरांची शिक्षणविषयक धारणाच और होती. माझ्या दृष्टीनं हे अवलिया अध्यापक होते. जीवनाकडे पाहण्याची त्यांची स्वतःची एक दृष्टी होती. १९९२ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी केलेलं 'आपण प्रयागे करुया' हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रयेंगाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करणारा आलेख होता. ज्यांना कुणाला प्रयोग परिवाराच्या या विज्ञानेश्वराला समजून घ्यायचं असेल त्यांनी हे भाषण वाचायला हवं.
प्रा. दाभोळकरांनी आपण केलेल्या प्रयोगाची माहिती 'ग्रंथरूपानं मागं ठेवली आहे. 'केल्याने होत आहे रे','विपुलाचं सृष्टी', ‘प्लेंटी फॉर ऑल' ही पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाउसनं प्रकाशित केली. या पुस्तकांचीही मोठी गंमतच आहे. लेखक प्रकाशकाला शोधत असतात. प्रा. दाभोळकरांना प्रकाशकांनी शोधून काढलं. दाभोळकर आपल्या प्रयोगाची छोटी टिपण छापायचे. प्रयोग परिवारात वितरीत करायचे. मेहतांच्या दुकानात शेतकरी शोधत यायचे. दाभोळकर सरांचं प्रयोग माऊलीचं फलाणं पुस्तक हाय का?' अनिल मेहतांनी एकदा त्यांना शोधून काढलं.
आपल्याकडे श्रम,ज्ञान,वळे यांचे मूल्य करण्या-आकारण्याची पद्धत नसल्याने आपण सारेच या बाबतीत वेंधळे,प्रा.दाभोळकरांनी कोणतीही