श्रीपाद अच्युत दाभोळकर, नंतर कळालं, की आता लोक मला सँड (एस. ए. डी.) दाभोळकर म्हणतात (अर्थात माघारी!) पण मॅडपेक्षा सँड बरं नाही का?
आज कळतं, सर सतत ‘सँड' राहिले. 'मॅड' (चांगल्या अर्थानं!) ते मुळात होतेच. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की परिपूर्तीपयर्तं त्यांना निश्चिंती नसायची. सरांनी कोणत्या क्षेत्रात प्रयोग, संशोधन किंवा अभ्यास केला नाही, हाच संशोधनाचा विषय ठरावा. शेती, विज्ञान, गणित, लोकशाहीकरण, आहार, आरोग्य, गर्भातील मुलाची वाढ, बाल संगोपन, निकापे यौवन, सुखी पालकत्व हे त्यांचे आजवरचे प्रयोग. प्रयोगांचे विषय ते ग्रंथालयातील विश्वकोषात शोधत नसायचे. परिसर हाच त्यांचा परिवार, पृथ्वी ही त्यांची प्रयोगशाळा. मनुष्यजीवन हा त्यांचा लक्ष्यबिंदू. भूत, वर्तमान नि भविष्य यांचा वेध घेण्याचं त्यांचं कसब केवळ अचंबित करणारं.
सरांचा जन्म साताऱ्याच्या ख्यातनाम दाभोळकर कुटुंबात झाला. या एका घराण्यातील दाभोळकर आडनावाची सारी माणसं नामांकित. प्रिन्सिपॉल,शं. गो. दाभोळकर (व्यासंगी समाजशील विधिज्ञ), अरुण दाभोळकर (प्रसिद्ध चित्रकार,जलतरंगातील गणपतीचे शेकडो मनोवेधक नमुने यांचेच),भरत दाभोळकर (प्रख्यात जाहिरातज्ज्ञ). तसं यांच्या घरातील कुलगुरु देवदत्त दाभोळकर, दत्त प्रसाद दाभोळकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर ही आपापल्या क्षेत्रातील दिग्गजच! सरांनी एम.एस्सी. होऊन शिक्षक होणं पसंत केलं. गारगोटीसारख्या आडगावी येऊन ते राहिले. इथल्या लाल मातीनं त्यांच्यासारखं अनेकांना म्हणजे आचार्य स.ज.भागवत, पद्मभूषण जे. पी. नाईक, डॉ. चित्रा नाईक आदींना ‘प्रयोग पंढरीचे वारकरी' बनवले. सर प्रारंभीच्या काळात रामे मधील ‘जागतिक भूक मुक्ती संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचे सदस्य झाले भुकेचा नि विकासाचा, दुष्काळाचा नि दारिद्र्याचा घनिष्ठ संबंध डॉ. अमर्त्य सेनांपूर्वीच सरांच्या लक्षात आला नि ते 'मनुष्य, जीवन व पृथ्वी' असा व्यापक विषय परीघ घेऊन प्रयोग करत राहिले. आजचे विज्ञान हे गरिबाला अधिक गरीब व श्रीमंताला अधिक श्रीमतं करणारे आहे, असे विज्ञान साचेबंदं तंत्रात अडकून, वस्तुरूप गोळीबंद करून भरमसाट नफ्याच्या योजना आखत विज्ञानाच्या नावावर बाजार करणाऱ्या भ्रष्ट अर्थव्यवस्थेचा भाग आहे, हे ओळखून सरांनी प्रयागे परिवार' सुरू केला. प्रत्येक व्यक्तीला सर्व त-हेचे उच्च ज्ञान, विज्ञान व संशोधन शाळा कॉलेजमध्ये न जाता स्वतःच्या प्रयोग अभ्याससाठी मिळाले पाहिजे,