पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रयोग परिवारी विज्ञानी : प्रा. श्री. अ. दाभोळकर

 'मला शांतपणे मरू द्या. मरताना मला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे, असं वैज्ञानिक विल्यम हार्वेनं म्हटलं होतं. प्रा. श्री. अ. दाभोळकरांनीही ते मूलतः प्रयागे शील असल्यानं त्यांनी हेच केलं असल्याचा संभव आहे. मला शांतपणे मरू द्या. मला मरताना वेदनांवर प्रयोग करायचा आहे.' असं ते म्हणाले असतील, तसं नसतं तर त्यांना मलेरियाच निमित्त होऊन मरण आलं नसत. जीवनात हरघडी, हरप्रसंगी प्रयोगशील सलगी नि संवाद करणाच्या दाभोळकरांनी आपल्या मरणावरही प्रयोग केला असावा, असं वाटण्याइतकं त्यांचं जाणं अकल्पित आहे.

 सर आम्हाला श्री मौनी विद्यापीठात गणित नि विज्ञान शिकवायचे. त्यांचं शिकवणं प्रायोगिकच असायचं. त्यांचा पहिला तास मला अजून आठवतो. १९६७-६८ असले, मी प्रिपेटरी पास होऊन डी. आर. एस.च्या प्रथम वषार्त गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. त्या वेळचं मौनी विद्यापीठ हे 'व्यासेगी (नि विक्षिप्तही!) विद्वानाची पंढरी म्हणून ओळखलं जायचं. युनेस्कोचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. व्ही. चिक्करमने, प्रसिद्ध मराठी कथाकार स्नेहलता दसनूरकर, प्रयोग परिवाराचे जनक प्रा. श्री. अ. दाभाळे कर अशी मंडळी आम्हाला शिकवायची. सर तासावर आले, (त्याचं शिकवणं स्वसंवादच असायचा.) की म्हणायचे, मी श्री. अ. दाभोळकर. माझं खरं नाव मुकुंद अच्युत दाभोळकर, कॉलेजमध्ये मुलं मला एम. ए. डी. या आद्याक्षरावंरून 'मॅड दाभोळकर' म्हणत. म्हणून मी ठेवलेले (ठेवणीतलं!) नाव वापरायला सुरुवात केली.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१२८