सदस्य म्हणून आज आयुष्याची नव्वदी पार केली तरी कार्यरत आहेत. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट व भाई माधवराव बागल विद्यापीठ ही त्यांची आजची कार्यक्षेत्रे होत. या माध्यमातून त्यांनी विविध स्पर्धा, मेळावे, परिसंवाद, व्याख्यानमाला कार्यकर्ता प्रशिक्षण, समाज प्रबोधन महोत्सव संयोजन अशी अनेक कार्ये केली. पण त्याचा आधार शाहू कार्यच राहिला. लेखक म्हणून प्रा. कणबरकरांनी अनके ग्रंथ आपणास दिले आहेत. त्यांचे लेखन इंग्रजी व मराठीत उपलब्ध आहे. एकूण सात ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले ‘भाई माधवराव बागल समग्र वाङ्मय' व अलीकडचे शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेले ‘ग्लिंप्ससे आफॅ राजर्षी शाहू महाराज हे चरित्र साहित्य क्षेत्रातील त्यांचे अजरामर योगदान म्हणून ओळखले जाइर्ल. स्वच्छ चरित्र, वादातीत व्यक्तिमत्त्व, विचारांची स्पष्टता अशा आपल्या अनके अंगभूत गुणांमुळे कणबरकर हे महाराष्ट्राच्या शिक्षण व समाजजीवनात अनुकरणीय आदर्श राहिले. राजर्षी शाहू पुरस्काराने ते सन्मानित आहते. आयुष्यभर निरपक्षे, निरलस राहणं ही पण एक जीवन साधनाच. ती फार कमी लोकांना जमते. कणबरकर सरांनी ती निभावली खरी!
पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/128
Appearance