पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरोगामी कुलगुरु : रा. कृ. कणबरकर

 प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांनी शिक्षण परिवर्तनात दोन्ही मार्गाने कार्य केले. त्यांचे प्रमुख कार्य अध्यापन व प्रशासकीय असले तरी त्यांच्या शिक्षकापेक्षा प्रशासकानेच अनेकदा बाजी मारल्याचे दिसते. निवृत्तीपर्यंत ते शिक्षणाच्या अध्ययन, अध्यापन, लेखन, वाचन अशा चतुर्दिक मार्गाने कार्यरत राहिले. त्यांनी परिश्रम,चिकाटी व सातत्याच्या जोरावर कामावरील आपली पकड अबाधित ठेवली. या त्यांच्या कृतीशील शिक्षणाचा, प्रबोधन कार्याचा गौरव राजर्षि शाहू पुरस्काराने झाला ही आनंदाची गोष्ट होय.
 प्राचार्य कणबरकर हे मूळचे बेळगावचे. सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण बेळगावीच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणून ते कोल्हापुरी आले. राजाराम महाविद्यालयात त्यांनी कलाशाखेत प्रवेश घेतला. बी. ए. व एम. ए. या दोन्ही पदव्या त्यांनी राजाराम महाविद्यालयातून मिळवल्या व ते इरग्रजीचे प्राध्यापक झाले. इंग्रजी ही विदेशी भाषा समजून घेण्यासाठी कणबरकर सरांनी हैद्राबादच्या मध्यवर्ती भारतीय इंग्रजी संस्थेतून इंग्रजी भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमह पूर्ण केला. या विशेष प्रशिक्षणामुळे अध्यापन कौशल्य विकसित झाले. त्यामुळे ते इंग्रजी विषयाचे निष्णात प्राध्यापक बनले.

 बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयातनू कणबरकरांचा शिक्षकी प्रवास सुरू झाला. भारत स्वतत्रं झाला आणि ते प्राध्यापक म्हणून परत महाराष्ट्रात आले. रयत शिक्षण संस्था, विवेकानंद शिक्षण संस्था व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या तीन नामांकित संस्थांमध्ये प्राचार्य म्हणून केलेल्या

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१२५