पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचे समग्र जीवन म्हणजे सुसंगत आचार नि आचार्य धर्माचा एक अनुकरणीय वस्तुपाठ. मला आठवतं सर, निवृत्त झाले १९८८ ला. निवृत्तीवेतन हाती आलं की माणसं चक्रवाढ व्याजाने ते गुंतवतात. सरांनी बालकल्याण संकुल, ‘सुटा'सारख्या संस्था, संघटनांची निवड करून त्यातील काही हिस्सा स्वेच्छादान केले. स्वातंत्र्यसैनिक म्हणून सरांना बसचा मोफत पास मिळाला. सरांनी त्याचा वापर तीर्थयात्रा, अष्टविनायक यात्रा असा न करता ते महाराष्ट्रभर फिरत राहिले. डॉ. नेल्सन मंडलो, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू महाराज, महात्मा गांधी, साने गुरुजी यांच्या जीवन व कार्यावर आधारित सुमारे हजारभर शाळांतून तीन लाख विद्यार्थ्यांचे प्रबोधन केलं.

 लेखन, प्रबोधन, संघटन, प्रचार, प्रसार, भ्रमण अशा अनेकविध मार्गांनी सरांनी समाजास सतत गती नि मती देण्याच सहकार्य केलं. सर्वोदय, राष्ट्रसेवा दल, रेडक्रॉस, रयत शिक्षण संस्था, आंतरभारती, गांधीतत्त्व प्रचार ही त्यांच्या जीवन व कार्याची क्षेत्रं. बापूसाहेब पाटलांच्या भाषेत मंदीच्या छायेत धुगधुगी धरून राहिलेल्या या मूल्यसंघटना. सरांसारख्या कार्यकत्र्यांनी मृत्यूपूर्व धडपड म्हणून जगवलेल्या एकविसाव्या शतकातला भारत मला अधिकाधिक भौतिकदृष्ट्या समृद्ध, उपभागे शील होणारा दिसतो आहे. युरोप-अमेरिकेतील समृद्धी हाच आमचा आता एकमेव आदर्श होऊ पाहतोय. भारतातील रोज समृद्धीकडे झेपावणाच्या प्रत्यके मध्यमवर्गीय कुटुंबातील एक निकटवर्ती अमेरिकेत असल्याचं दिसू लागलं असताना सरांचा अमृतमहोत्सव मागे पडणाच्या मूल्यांचं स्मरण देण्याच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचा ठरतो.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/११३