पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/113

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


विद्याथ्यार्त उमटली. त्यातून विद्यार्थी आंदोलन उदयास आले. विद्याथ्र्यांनी कॉलेजवर बहिष्कार टाकून आंदोलन तीव्र केलं. त्या वेळी कोरगावकर कंपौंडमध्ये राष्ट्रसेवा दलाची शाखा चालायची. राजा विचारे, विश्वनाथ बांदिवडेकर, जगन्नाथ फडणीस, बापूसाहेब पाटील प्रभृती मित्रांसह सर या शाखते सक्रिय होते. १५ ऑगस्ट, १९४२ ला त्या वेळीच्या रविवार बुरुजाजवळ आताचा (बिंदू चौक) बंड्या हरिदास नावाच्या पोलिसाने केलेल्या मारहाणीत बिंदू माधव कुलकर्णीचा मृत्यू झाल्याने विद्याथ्यार्तं तीव्र असंतोष निमार्ण झाला होता. आजचे कॉम्रड यशवतं चव्हाण त्या वेळी विद्यार्थी संघटनेचे नेते होते. त्यांचे त्या वेळी एक प्रभावी भाषण झाले. त्यातून ज्या अनके विद्यार्थ्यांनी स्वतःला चळवळीत झोकून दिले, त्यापैकी सर एक होते. सोळा ऑगस्टला बिंदू माधव कुलकर्णीची निघालेली आजवरची कोल्हापुरातील सर्वांत मोठी अंत्ययात्रा, मुकयात्रा काढण्याच्या अटीवर त्या यात्रेत नि स्मशानभूमीवर ‘स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही', अशा शीर्षकाखाली जी प्रक्षोभक पत्रे वाटण्यात आली त्यात सरांचा सहभाग होता.
 सरांनी त्या वेळी पुढे ९ ऑगष्ट, १९४२ ते फेब्रुवारी १९४३ या काळात भूमिगत राहून स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. बॅरिस्टर खर्डेकरांच्या सहकार्यामुळे ज्या अनेक विद्यार्थ्यांना जीवदान मिळाले, त्यात सर एक होते. त्यामुळे ते पुढे बी. ए. झाले, सन १९४६ ला पदवीधर झाल्यावर ते १९५० पर्यंत राष्ट्रसेवा दलाचे पूर्णवेळ सेवक म्हणनू कार्यरत राहिले. सन १९५०-५१ मध्ये ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात शिकले. पण विवाहामुळे शिक्षण खंडित झाले. विवाहानंतर सर विद्यापीठ हायस्कूलमध्ये इतिहास व नागरिकशास्त्राचे शिक्षक झाले. पुणे १९५४ ला ते बी. टी. झाले. सन १९५८-५९ ला बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीची एम. ए. केले. पदवी संपादिली. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या माध्यमातून राष्ट्रभाषा प्रचार कार्य कले. पुढे प्रारंभी कीर्ती कॉलेजात, तर नंतर शाह महाविद्यालयात ते हिंदीचे प्राध्यापक झाले. शिवाजी विद्यापीठाचे सिनेट नि कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांचे कार्य संस्मरणीय ठरले. आंतरभारती'च्या स्थापनेतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

 प्रा. पाटगावकर यांना मी १९६३ पासून आजवर अनेक अंगांनी स्तरावर पाहात आलो. ‘साधी राहणी नि उच्च विचारसरणी' असं परवलीचं जीवनसत्रू ते कधी सांगत बसले नाहीत.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/११२