पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांधीवादी सर्वोदयी : प्रा. चंद्रकांत पाटगावकर

 प्रा. चंद्रकांत पाटगावकरांनी, युवावस्थेत स्वतः ला विद्यार्थी चळवळीद्वारे राष्ट्रीय चळवळीशी जोडलं. नंतर सेवा दलाचे ते सर्ववेळ सेवक नि सघंटक झाले. पुढे शिक्षक, प्राध्यापक झाले, तरी त्यांच्यातील राष्ट्रीय बाण्याच्या समाजसेवक, प्रबोधकाने कधी हाय खाल्ली नाही. कोयना भूकंप, बिहार दुष्काळ, हिंदी विरोधी दक्षिणेतील आंदोलन, श्रम संस्कार छावणी अशा किती तरी आव्हानात्मक प्रसंगी प्रा. पाटगावकर यांनी स्वतःला झोकून दिलं. त्यांचं झोकून देणं कधीच एकाकी नव्हतं. प्रत्यके शिबिर, प्रचार, प्रबोधन कार्यास ते आपल्या विद्यार्थ्यांसह उतरले. सरांचं मोठेपण मला त्यांच्या विद्यार्थीनुवर्ती व्यक्तिमत्त्वात दिसतं. शिक्षकांच्या हाताखालनू अनके विद्यार्थी जात असतात. त्यांच्या हाताला किती विद्यार्थी लागले हे महत्त्वाचं. अस्मादिकांशिवाय ‘उपरा'कार लक्ष्मण माने, देवदासी चळवळीचे जनक प्रा. विठ्ठल बन्ने, मराठी समीक्षक प्रा. कमलाकर दीक्षित, ऑस्ट्रेलियातील प्रख्यात मकरंद टेंबे, किर्लोस्कर उद्योगाचे प्रमुख श्याम गोखले वृत्तपत्र विद्याशाखेचे प्रमुख डॉ. ज. वा. जोशी हे त्यांच्या हाती लागलेल्या काही विद्यार्थ्यांपैकी होत. बऱ्याचदा शिक्षकच हा माझा विद्यार्थी म्हणून सांगत असतात. हे आमचे सर' अशी प्रत्यक्ष नि पाठीमागेही ओळख सांगणारे सरांचे अनेक विद्यार्थी मला माहीत आहेत.

 तत्कालीन भक्तिसेवा विद्यापीठातून सर मॅट्रिक प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्या वेळी १९४२ चे ‘भारत छोडो' आंदोलन समेवर होतं. सरांनी मॅट्रिक होऊन राजाराम कॉलेजमध्ये प्रवशे घेतला होता. इंग्रजांनी महात्मा गांधींना अटक केल्याची तीव्र प्रतिक्रिया त्या वेळच्या युवकांत, महाविद्यालयीन

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१११