पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पानसरे एका विशिष्ट पक्षाचे संघटक वा कार्यकर्ते नव्हेत. ते कार्यकर्ते घडविणारे समाजशिक्षक आहेत. आधी केले नि मग सांगितले हा त्यांचा परिपाठ असल्यानं त्यांच्यामागं कार्यकर्त्यांच मोहोळ सतत घोंघावत असल्याचं मी अनुभवलंय! या माणसास कुठे, कसं नि कुणास घेऊन जायचं पक्कं भान असल्यानं त्यांची फसगत झाली असं कधी घडलं नाही. त्यांच्यामागे घोंघावणाच्या मोहोळात बुद्धिजीवी असतात नि श्रमिकही. कोल्हापूरच्या राजकीय नेतृत्वाचं पुढारीपण गेली अनेक वर्ष ते करत आलेत. पक्षीय अभिनिवेश सोडून राजकीय मंडळी ज्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली एकत्र येतात त्यांचं नाव गोविंदराव पानसरे!
 पानसरे जसे कुशल संघटक, तसे वक्ते नि लेखकही. कामगार, विद्यार्थी, कर्मचारी कुणाचीही सभा असो, प्रत्येकाला पानसरेंचे मार्गदर्शन हवंसं वाटत असतं. शिवाजी कोण होता?' हे १९८४ मध्ये लिहिलेलं त्यांचं पुस्तक युती शासनाच्या गेल्या दोन वर्षांच्या काळात अधिक वाचलं जाऊ लागलं. त्यात त्यांच्यातील लेखकाचं द्रष्टेपण दिसून येतं. अगदी अलीकडे त्यांनी लिहिलेले ‘राजर्षि शाहूः वसा आणि वारसा' हे पुस्तकही असेच लक्षवेधी. त्यांच्या विचार नि लेखनास एक चिकित्सक बैठक आहे. काळापुढे पाहण्याची त्यांची दृष्टी त्यांचं पुरोगामित्व सिद्ध करते. ‘मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न' सारखं त्यांचं पुस्तक वाचलं की। पक्षीय अभिनिवेशापलिकडे जाऊन समाजरचनेचं आकलन करण्याचं या माणसाचं कसब केवळ थक्क करून सोडणारं!' समकालीन समस्यांची तर्कपूर्ण मांडणी हे त्यांच्या लेखनाचं आणखी एक वैशिष्ट्य. समाज मतिगुंग होत असताना (खरं तर नेते समाजास गुंगारा देत असताना) पानसरेंनी आपल्या लेखणीनं प्रत्येक वेळी समाजास वैज्ञानिक दृष्टी दिली व काळाचं आव्हान पेलणारं मार्गदर्शन दिलं. '३७० कलमाची कुळकथा', 'मुस्लिमांचे लाड','पंचायत राज्याचा पंचनामा'सारख्या पुस्तिका ही त्यांची ठळक उदाहरणं! सामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून कमीत कमी शब्दांत सोप्या पद्धतीनं लिखाण करणारे भाई माधवराव बागल-त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार गोविंदराव पानसरे यांना मिळणे क्रमप्राप्तच होतं.

 पानसरे हे कोल्हापुरातील निष्णात वकील. त्यांनी सतत कष्टकरी नि कामगार वर्गाची किली केली. बऱ्याच मडंळींच्या जागा बदलल्या की, वकिली बदलल्याचा अनुभव येतो. पानसरे यांचं असं घडलं नाही. कोर्टातील, कोपरा सभातील मांडणीत तुम्हास कधी खोट दिसणार नाही की विसंगती.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१०९