इथली त्या वेळची आठ रुपये फी भरणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्या वेळी बिंदू चौकात असलेल्या ‘बुक स्टॉल द रिपब्लिक'मध्ये वृत्तपत्र विक्रेत्याचं काम पत्करलं त्या वेळी सध्याच्या बिंदू चौकात असलले डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांचे पुतळे खाली व एकमेकांपासून दूर होते. त्या पुतळ्यांमागे कौन्सिलचे मोठे दिवे होते. त्या दिव्याखाली अभ्यास करायचा व पुतळ्याच्या चबुतऱ्यावरच वामकुक्षी असं त्यांचं जीवन होतं. कोटीतीर्थ हे आंघोळीचं ठिकाण. अशी त्रिस्थळी जीवनयात्रा कंठत असताना, स्वतःचा स्वतःशी संघर्ष सुरू असल्यापासून ते वेगवेगळ्या चळवळीशी नातं जोडत गेले. कोल्हारला असताना पत्की सरांच्या विचार, कार्यान प्रभावित होऊन त्यांनी राष्ट्र सेवा दलात काही काळ उमेदवारी केली. कोल्हापुरात आल्यावर ते येथील विद्यार्थी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते झाले. मॅट्रिकमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शास्त्र शाखेत प्रवेश न मिळाल्यानं बी. ए. झाले. या काळात सप्रे गुरुजींचा त्यांना मोठा आधार मिळाला. शेख सनाउल्ला, शंकराव सावंत या आपल्या तत्कालीन सहका-यांसह त्यांनी १९५२ पासून कम्युनिस्ट पक्षाचे काम सुरू केलं. मधल्या काळात ते कोल्हापूर म्युनिसिपल कौन्सिलच्या जकात खात्यात शिपाई होते. पुढे शिपायाचे प्राथमिक शिक्षक झाले नि त्यांच्यातील कार्यकर्त्यानं संघटकाचं रूप धारण केलं.
{gap}}सन १९५५ ला गोवा मुक्ती आंदालनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रसेवा दलाच्या पठडीत वाढलेले अनके कार्यकर्ते पुढे समाजवादी पक्षात गेले. तसे पानसरेही. पण त्यांचा पिंड मुळातच मूलभूत परिवर्तनकारी विचारांच्या असल्यानं ते डाव्या समाजवादी गटात (Left Socialist Group) गेले. पुढे कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या जीवन व कार्याचा केंद्रबिंदू झाला. कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखालील सातत्यपूर्ण वाटचालीत त्यांनी अनके लढे दिले, चळवळी केल्या, तुरुंगवास भोगला, अनके कामगार संघटना उभारल्या नि विस्तारल्या. पक्षकार्याचा भाग म्हणून स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक जबाबदा-या पेलल्या. ऑल इंडिया स्टुडंडस् फेडरेशन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बार कौन्सिल, लेबर लॉ प्रेक्टिशर्स असोसिएशन, समाजवादी प्रबोधिनी, लाके वाङ्मय प्रकाशन गृह, अशा संस्था व संघटनात्मक कार्यातून त्यांनी काळम्मावाडी धरणगस्त आंदोलने, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, उपासमारविरोधी आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र राखीव जागांसाठी आंदोलन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलन आदींमध्ये केवळ सहभाग घेतला असं नव्हे, तर त्याचं नेतृत्वही केलं.